बिटको महाविद्यालयात कारगिल विजय दिवस विविध उपक्रमांनी साजरा.....

नाशिकरोड :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात माहिती व प्रसारण मंत्रायल भारत सरकार आणि बिटको महाविद्यालय एनसीसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय सैन्याच्या अस्सीम शौर्याची आठवण जागृत करणाऱ्या कारगिल विजय दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात कारगिल विजय दिवसानिमित्त आयोजित प्रदर्शनी व स्पर्धांचे उदघाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे यांनी केले. यनिमित्त दोन दिवसीय विविध स्वातंत्र्य सैनिकांच्या माहितीचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. कारगिल विजय दिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. यात जवळपास १५० विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. याप्रसंगी पाकिस्तानी शत्रूना युद्धात हरवून भारतासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या ५२७ शूरवीर जिगरबाज सैनिकांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सेवानिवृत्त कर्नल एम. व्ही. शशिधर व एस. बी. मालखेडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमासाठी माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकार, नाशिक ऑफिस चे क्षेत्रीय प्रचार अधिकारी श्री. सदाशिव मुलखेडकर, श्रीमती वंदना थिगळे, कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पठारे, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. सतिश चव्हाण, एनसीसी विभागाचे लेफ्टनंट डॉ. विजय सुकटे, जुनिअर कॉलेजच्या उपप्राचार्या रागिणी भवर, डॉ. सुधाकर बोरसे तसेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, एनसीसी कॅडेट्स आणि विद्यार्थी उपस्थित होते.