उत्तुंग झेप फाउंडेशनतर्फे व छत्रपती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिखरेवाडी मैदानात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

उत्तुंग झेप फाउंडेशनतर्फे व छत्रपती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिखरेवाडी मैदानात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

नाशिक रोड | प्रतिनिधी

७९ वा स्वातंत्र्य दिन सोहळा उत्तुंग झेप फाउंडेशन व छत्रपती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिखरेवाडी ग्राउंड येथे देशभक्तीच्या वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता झालेल्या ध्वजारोहण व कार्यगौरव सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भारतीय सैन्यदलाचे लेफ्टनंट कर्नल अजित ओढेकर होते. कार्यक्रमाला कर्नल विनोद कुमार, विजय देढे व विनय जठार यांची विशेष उपस्थिती लाभली.

मान्यवरांच्या हस्ते पत्रकारिता, शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक, वैद्यकीय, महिला सक्षमीकरण, उद्योजिका व ज्येष्ठ नागरिक अशा विविध क्षेत्रांतील व्यक्तींना कार्यगौरव सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्तुंग झेप फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशपांडे व छत्रपती फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश राजाभाऊ कदम यांनी केले. सूत्रसंचालन भाग्यश्री देशपांडे यांनी तर आभार प्रदर्शन यश बच्छाव यांनी केले.ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. फ्लाइंग कलर्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर वेशभूषेत राष्ट्रध्वजाला सलामी दिली. कार्यक्रमाचे संयोजन दोन्ही फाउंडेशनच्या कार्यकारिणीने केले.

कार्यक्रमाची सांगता “वंदे मातरम” गीताने झाली. या प्रसंगी पुरुषोत्तम शाळा १९८२ बॅचचे विद्यार्थी मित्र, नार नाशिक रोड रिअल इस्टेट असोसिएशन चे पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित पुरस्कार्थी

पत्रकारिता – दिगंबर सहाणे, अंबादास शिंदे, मनोज मालपाणी, श्रीधर गायधनी, डॉ. बाळकृष्ण शेलार, सचिन वाघ, चंद्रकांत बर्वे, अनिल गुंजाळ, प्रफुल्ल पवार, शकील शेख, (डिजिटल मीडिया) प्रशांत जेजुरकर, संदीप नवसे.

वैद्यकीय सेवा – डॉ. बाळासाहेब निरगुडे, डॉ. सुनील हिरे, डॉ. प्रशांत कुटे.

सामाजिक सेवा – दत्ता बच्छाव, हेमंत गाडे, विलास भोळे, दत्तात्रय डबे.

क्रीडा क्षेत्र – अशोक सानप, गणेश ढेमसे.

महिला सक्षमीकरण – मनीषा नेरे, प्रियांका पटेल, अंजली विसपुते, माया कऱ्हाळे, छाया उगले

आरोग्य सेवा – विजय मोरे.(मनपा, नाशिक)

शैक्षणिक सेवा – हेमराज गायकवाड, इंद्रजित सांगळे,अपेक्षा देशमुख, संगीता साळवे, रोहिदास घोलप, समाधान भोर.