बिटको महाविद्यालयात ७९ वा ' स्वातंत्र्य दिन ' उत्साहात साजरा ....

नाशिकरोड : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात ७९ वा ' भारतीय स्वातंत्र्य दिन ' उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. एनसीसी आर्मी व एअरविंगच्या विद्यार्थ्यांनी परेड संचलन करून ध्वजास मानवंदना दिली. याप्रसंगी प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे यांनी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करून स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी हुंडा न घेण्याची व अंमली पदार्थ विरोधी शपथ सर्व उपस्थितांना देण्यात आली. यात मी कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ, मादक द्रव्य घेणार नाही, माझे जीवन स्वच्छ निरोगी आणि व्यसनमुक्त ठेवीन माझ्या मित्रांना कुटुंबाला तसे समाजाला व्यसना पासून दूर राहण्याचा सल्ला देईन अशी शपथ यावेळी घेण्यात आली. याप्रसंगी कला शाखा उपप्राचार्य डॉ.अनिलकुमार पठारे, वाणिज्य शाखा उपप्राचार्य डॉ. आकाश ठाकूर, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. सतीश चव्हाण, कनिष्ठ महाविद्यालयाच्या नवनियुक पर्यवेक्षिका सौ. आर. एस. पाटील, एनसीसी आर्मी विंग लेफ्टनंट डॉ. विजय सुकटे, देवेंद्र हातखंबकर यासह संस्थेच्या नाशिकरोड केंद्रातील सर डॉ. मो. स. गोसावी तंत्रनिकेतनच्या प्राचार्या श्रद्धा देशपांडे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी फारूक मुलाणी , विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.दीपक टोपे, क्रीडाशिक्षक धनंजय बर्वे, योगेश शिंदे , जयराम हायस्कूलचे मुख्याध्यापक अस्मिता देशपांडे, शालिनी खरे , ,जेडीसी बिटको इंग्लिश मीडियम हायस्कूलचे मुख्याध्यापक दावल नन्दन, हेमलता तांबोळी, कुलसचिव राजेश लोखंडे, विद्यार्थी सभा कार्याध्यक्ष लक्ष्मण शेंडगे ,सुहास माळवे तसेच राजेंद्र साळुंके, विजय सूर्यवंशी यासह विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक आदी उपस्थित होते. त्यानंतर नवनियुक्त शिक्षक तसेच पीएचडी व विविध पुरस्कार प्राप्त प्राध्यापकांचा सत्कार समारंभ पार पडला .