श्री सप्तश्रुंगी महाविद्यालयात महिला सबलिकरण व सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न

श्री सप्तश्रुंगी महाविद्यालयात महिला सबलिकरण व सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नियोजन व विकास विभाग व श्री सप्तश्रुंगी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या  संयुक्त विद्यमाने महिला सबलिकरण व सक्षमीकरण कार्यशाळा दि. 13 ऑगस्ट 2025 रोजी संपन्न झाली. कार्यशाळेची सुरुवात विद्यापीठ गीताने झाली.नंतर पहिल्या सत्राचे  प्रस्ताविक प्रा. देवरे वैभव यांनी केले व पाहुण्यांचा परिचय प्रा. पांडुरंग जाधव यांनी करून दिला, कार्यशाळाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही हिरे हे होते. तर प्रमुख पाहुणे देवळा येथील क. रा.आ महाविद्यालयांचे डॉ.प्रोफेसर जयवंत भदाणे हे होते, त्यांनी 'स्त्री परिस्थितीची परीक्षा आणि निर्णयाची उत्तरमाला ' ह्या विषयावर मार्गदर्शन केले, त्यांनी सांगितले की आजची स्त्री ही निर्णय, चतुराई आणि सर्वांवर राज करणारी चेंज मेकर म्हणून गणली जाणारी आहे, असे प्रतिपादन केले, तसेच आभार प्रा. नाडेकर आर. डी यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. रीना बाविस्कर यांनी केले.

दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही हिरे होते व प्रमुख पाहुणे डॉ. आम्रपाली भामरे ग्रामीण रुग्णालय डांगसौंदाणे ह्या होत्या त्यांनी 'महिला स्वास्थ्य 'ह्या विषयावर मार्गदर्शन केले, त्यांनी महिलांच्या आरोग्याशी सांबंधित बाबी, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्याविषयी विद्यार्थिनी संपर्क साधला. तसेस स्त्री समस्या ह्यावर विद्यार्थीसी हितगुज व चर्चा केली. तसेस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ हिरे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात महिला आरोग्य ह्या विषयावर मार्गदर्शन केले. महिला सबलिकरणामुळे समाजाचा सर्वांगीण विकास होतो, कारण महिला समाजाचा एक महत्वाचा घटक आहे.आजची स्त्री ही स्वावलंबी असून काळानुसार बदल करणारी आहे असे मत मांडले,तसेस आभार प्रा. जाधव दिक्षा यांनी मांडले  कार्यक्रमासाठी देवळा महाविद्यालयाचे प्रा. मुरलीधर बच्छाव होते तसेस महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.शेवटी राष्ट्रगीताने कार्यशाळेची सांगता झाली.