मुळाने गावात जागतिक आदीवासी दिवस उत्साहात साजरा

मुळाने गावात जागतिक आदीवासी दिवस उत्साहात साजरा

मुळाने गावात जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला ह्या कार्यक्रमनिमित्त

आदिवासी-हक्क, स्त्री-स्वातंत्र्य, मानवी प्रतिष्ठा यांच्यासाठी लढा देणारा पहिला आदिवासी नेता म्हणून भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली तसेस आदिवासी कोळी महादेव समाजातील आद्यक्रांतिकारक सह्याद्रीचा वाघ म्हणून ओळखले जाणारे राघोजी भांगरे त्यांनी इंग्रजांच्या अन्याय,अत्याचार ह्याविरुद्ध बंड करणारे व सावकार, जमीनदार यांच्या विरुद्ध आवाज उठवणारे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे ह्यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली तसेस प्राचीन भारतातील जंगल जमतींचा संघ निषाधाचे तरुण गुरूंचा आदर करणारे वीर एकालव्य यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली. ह्या कार्यक्रमानिमित्त गावातील सरपंच निकम संदीप, पोलीस पाटील संदीप ह्याळीज, आदीवासी संघटना अध्यक्ष खंडू नारायण नाडेकर, सुभाष दामू नाडेकर, बापू पवार, अक्षय नाडेकर, धर्मा नाडेकर,सर्व ग्रामस्थ व पदाधिकारी यांनी आदिम शुभेच्छा दिल्या.