नाशिक महानगरपालिकेतर्फे दीनदयाल जन आजीविका योजना (शहरी) अंतर्गत बचत गटांच्या वस्तू व सेवांचे भव्य प्रदर्शन

नाशिक महानगरपालिकेतर्फे  दीनदयाल जन आजीविका योजना (शहरी) अंतर्गत बचत गटांच्या वस्तू व सेवांचे भव्य प्रदर्शन

नाशिक – दीनदयाल जन आजीविका योजना (शहरी) / DAY NULM अंतर्गत नाशिक महानगरपालिका स्थापन केलेल्या बचत गटांमार्फत तयार करण्यात आलेल्या विविध वस्तू व सेवांचे भव्य विक्री प्रदर्शन / मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

नवरात्री निमित्त या प्रदर्शनाचा पहिला टप्पा दि. २६ ते २८ सप्टेंबर २०२५ दरम्यान महात्मा फुले कलादालन, शालीमार येथे होणार असून यात शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नाशिक महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

या मेळाव्यात १०० ते ११० बचत गटांद्वारे तयार करण्यात आलेल्या वस्तू व सेवांचा समावेश असून महिलांकडून बनविलेल्या खाद्यपदार्थ, दागदागिने, कपडे, सजावटीचे सामान यांसह विविध वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात येणार आहे.

महानगरपालिकेने नागरिकांना या उपक्रमाचा लाभ घ्यावा तसेच स्थानिक महिला बचत गटांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले आहे.