लोक कल्याण मेळावा अंतर्गत FSSAI मार्फत पथविक्रेत्यांना मोफत अन्न सुरक्षा प्रशिक्षण

लोक कल्याण मेळावा अंतर्गत FSSAI मार्फत पथविक्रेत्यांना मोफत अन्न सुरक्षा प्रशिक्षण

विषय: लोक कल्याण मेळावा अंतर्गत FSSAI मार्फत PM स्वानिधी योजनेअंतर्गत कर्ज घेतलेल्या अन्न पदार्थ विकणाऱ्या पथविक्रेत्यांना अन्न सुरक्षा नियमांची मोफत प्रशिक्षण व प्रमाणपत्र .... 

पंतप्रधान स्ट्रीट व्हेंडर आत्मनिर्भर निधी (PM SVANidhi) योजना जून 2020 मध्ये सुरू करण्यात आली असून आतापर्यंत नाशिक महानगरपालिका अंतर्गत ३८,८४० पथविक्रेत्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. अलीकडेच केंद्रीय मंत्रिमंडळाने PM SVANidhi योजनेच्या पुनर्रचनेला आणि विस्ताराला मार्च 2030 पर्यंत मंजुरी दिली आहे. या योजनेचा परिणाम अधिक व्यापक करण्यासाठी तिची पुनर्रचना करण्यात आली असून, त्यात आर्थिक समावेशन बळकट करणे, डिजिटल व्यवहारांचा अवलंब प्रोत्साहन देणे, क्षमता विकास आणि विक्रेते व त्यांच्या कुटुंबियांचा सामाजिक-आर्थिक विकास यावर भर देण्यात आला आहे. भारत सरकारकडून PM SVANidhi योजनेअंतर्गत दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत देशभरात विशेष अभियान – लोक कल्याण मेळावा आयोजित करण्यात येत आहेत.

लोक कल्याण मेळावा अंतर्गत भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण FSSAI मार्फत PM स्वानिधी योजनेअंतर्गत कर्ज घेतलेल्या अन्न पदार्थ विकणाऱ्या पथविक्रेत्यांना अन्न सुरक्षा नियमांची मोफत प्रशिक्षण व प्रमाणपत्र देण्याकरिता दिनांक २६/०९/२०२५ रोजी सकाळी ११.०० ते १.०० वाजेपर्यंत दादासाहेब गायकवाड सभागृह, नाशिक येथे मोफत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षणाचा सर्व PM स्वानिधी योजनेअंतर्गत कर्ज घेतलेल्या अन्न पदार्थ विकणाऱ्या पथविक्रेत्यांनी लाभ घ्यावा. तसेच अन्न पदार्थ विकणाऱ्या पथविक्रेत्यांनी प्रशिक्षणास येताना PMS क्र.,आधार कार्ड आणि फोन सोबत आणावा असे आवाहन मा. उपआयुक्त(NULM) श्रीमती सुवर्णा दखणे (नाशिक महानगरपालिका) यांच्यावतीने करण्यात येत आहे. 

पंतप्रधान स्ट्रीट व्हेंडर आत्मनिर्भर निधी (PM SVANidhi) योजनेची पुन्हा सुरवात झाली आहे याची नोंद सर्व पथ विक्रेत्यांनी घ्यावी .पीएम स्वनिधी योजनेंतर्गत लाभ घेण्यास इच्छुक पथ विक्रेत्यांनी आपल्या जवळच्या ग्राहक सेवा केंद्र (CSC)/आपले सरकार केंद्र येथे जाऊन कर्जाचे अर्ज भरावे. तसेच  पीएम स्वनिधी योजनेंतर्गत आतापर्यंत कर्ज लाभ घेतलेल्या सर्व पथविक्रेत्यांनी सामाजिक-आर्थिक प्रोफाइलिंग ऑनलाईन पोर्टलवर भरण्याकरिता आपल्या जवळील नाशिक महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालयातील NULM कक्षात जाऊन माहिती भरावी, अधिक माहितीसाठी नाशिक मनपाच्या संबंधित विभागीय कार्यालयात संपर्क साधावा.