रायझिंग सिंगर्स प्रस्तुत ' ये दोस्ती हम नही तोडेंगे ' सांगितिक मेजवानीत रसिक दंग .....

रायझिंग सिंगर्स  प्रस्तुत ' ये दोस्ती हम नही तोडेंगे ' सांगितिक मेजवानीत रसिक दंग .....

नाशिकरोड :  " अब मुझे रात दिन, दोनोने किया था प्यार मगर, तेरे जैसा यार कहा, मनाच्या धुंदीत, माळ्याच्या मळ्यामधी कोण गं उभी, झीलमील सीतारोका आंगन, ओले ओले, ये दोस्ती हम नही, तुझे देखा तो ये जाना सनम, कान्हा सो जा जरा," अशी एक से गाणी कलाकारांनी सादर करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले .

          निमित्त होते नाशिक इंदिरानगर येथील रायझिंग सिंगर्स कराओके ग्रुप प्रस्तुत रुपेश शिंपी आयोजित  ' ये दोस्ती हम नही तोडेंगे '  यासदाबहार सुमधुर मराठी, हिंदी गीतांची संगितमय  कार्यक्रम इंदिरानगर येथील स्वर्णिमा हॉल येथे बुधवार दि. ६ ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या व रसिकांच्या उपस्थितीत उत्साहात सम्पन्न झाला . या संगीतमय मैफिलीत रायझिंग सिंगर्स ग्रुपचे कलाकार यांनी विविध गाणी सादर  केली . यात स्वतः रुपेश शिंपी यासह विनोद साखरे, प्रकाश महाले, संजय परमसागर, धनंजय भावसार, अँथोनी सरदार,  हेमंत अहिरराव, दिपाली मिस्त्री, रूपाली नागरे, नूतन मिस्त्री,  योगिता गोसावी, जयश्री माळी, निवेदिता कस्तुरे, सुनील मिस्त्री, संदीप सोनवणे, विलास गोसावी या गायकांनी  एक से एक विविध गीते सादर केली. या गाण्यांचा आनंद  घेत रसिकांनी  मोठ्या संख्येने उपस्थित राहून उस्फुर्त दाद दिली . 

           प्रारंभी मान्यवर श्री सुभाष व सौ. सुशीला  शिंपी, सुनिल सोनवणे, कुलकर्णी काका शरद सोनवणे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.   रायझिंग सिंगर्स ग्रुप वतीने हा तिसरा कार्यक्रम आयोजित होत असून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात यात '  वृक्ष लावा वृक्ष जगवा, कापडी पिशव्या वाटप तसेच वृद्धाश्रमास, गरीब होतकरू विद्यार्थ्यास व दिव्यांग बंधूस तसेच अक्षय फाउंडेशनला मदत असे विविध उपक्रम ग्रुप तर्फे राबवले जात असल्याची माहिती संयोजक रुपेश शिंपी यांनी दिली. या कार्यक्रम व उपक्रमांसाठी नितीन जगदाळे व सौ. माधुरी शिंपी यांनी मोलाचे सहकार्य केले. सौ. रोहिणी सोनार यांनी खुमासदार काव्यशैलीत  सूत्रसंचालन करून रसिक श्रोत्यांना खीळवून ठेवले . श्री. पवन रोकडे यांनी ध्वनीसंयोजन केले.