स्वरांगण संगीत गुरुकुलाचा विद्यार्थी जिल्ह्यात प्रथम

नुकत्याच पार पडलेल्या के के वाघ शिक्षण संस्थेच्या गुरु शिष्य स्मृतीमहा स्पर्धेत स्वरांगण संगीत गुरुकुलाचा विद्यार्थी कु. आराध्य मयुरी संतोष खडके भावगीत गायन स्पर्धेत लहान गटात जिल्ह्यात प्रथम
स्पर्धेत एकूण ४० स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला होता, त्यामध्ये आराधने प्रथम क्रमांक पटकावला आहे
माझे जीवन गाणे हे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे गीत त्याने सादर केले
गुरु सागर कुलकर्णी यांच्याकडे तो सध्या गुरुकुल पद्धतीने तालीम घेत आहे
स्वरांगणचे आणि ऋतुरंगचे श्री विजय संकलेचा, संतोष जोशी, प्रफुल्ल कुलकर्णी, राहुल हिंगे, ज्ञानेश्वर करपे यांनी त्याचे अभिनंदन केले