बँक ऑफ महाराष्ट्र आशानगर शाखेत लोक कल्याण मेळावा

बँक ऑफ महाराष्ट्र आशानगर शाखेत लोक कल्याण मेळावा

दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र, आशानगर (नाशिकरोड) शाखेमार्फत “लोक कल्याण मेळावा” हा उपक्रम उत्साहात पार पडला. या मेळाव्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमात शाखा प्रबंधक दिनकर दाते, उपनगर शाखा प्रबंधक अभिजित कुलथे, जेलरोड शाखेच्या नीलिमा खर्चे, तसेच बीटको कॉलेज शाखेच्या नितुश्री कांबळे (जिल्हा अग्रणी बँक) उपस्थित होते. आर्थिक साक्षरता सल्लागार (FLC) अनुराधा लोंढे, नाशिक महानगरपालिका नाशिकरोड विभाग समूह संघटिका पल्लवी श्रीमाळी आणि सोनी सोनसाळे यांनी मेळाव्याचे आयोजन सुयोग्यपणे केले.

कार्यक्रमात प्रधानमंत्री स्वनिधी (PM SVANidhi) योजनेअंतर्गत एकूण 65 लाभार्थी उपस्थित होते. या सर्व लाभार्थ्यांना Sanction Letter वितरित करण्यात आले. बँकेच्या विविध योजनांची माहिती देऊन लघुउद्योजकांना आत्मनिर्भरतेकडे मार्गदर्शन करण्यात आले.