नाशिकमध्ये राजेश खन्ना यांच्या सदाबहार गीतांची सुरेल मैफिल नाशिक

नाशिकमध्ये राजेश खन्ना यांच्या सदाबहार गीतांची सुरेल मैफिल नाशिक

बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार, स्वर्गीय राजेश खन्ना यांच्या जयंतीनिमित्त रसिक सुर ग्रुपच्या वतीने एक विशेष संगीत मैफिल आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यक्रम गुरुवार, दि. 18 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता इंदिरा नगर येथील स्वर्णिमा हॉल (बापू बंगल्या समोर) येथे होणार आहे.

या संगीत मैफिलीत राजेश खन्ना यांच्या चित्रपटांतील अविस्मरणीय, सदाबहार व रसिकांच्या मनात आजही घर करून राहिलेल्या गीतांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. संगीतप्रेमी रसिकांसाठी ही एक सुरेल मेजवानी ठरणार आहे.

या कार्यक्रमाच्या संस्थापिका सौ. अनघा ताई धोडपकर असून संकल्पना अतुल कुलकर्णी यांची आहे. कार्यक्रमात मंगेश खोत, अशोक वाघ, अजय चव्हाण, मोहन दुसाने, दत्ता दंडगव्हाळ, गणेश खांबेकर, निपेश सचदे, रेखा ठाकूर व नीता चव्हाण हे कलाकार सहभागी होणार आहेत.

राजेश खन्ना यांच्या अजरामर गीतांतून त्यांच्या स्मृतींना उजाळा देत संगीतप्रेमींना भावणारी ही संध्याकाळ अनुभवण्यासाठी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.