बिझनेस बँकेत संचालकपदी चार जणांची बिनविरोध निवड
नाशिकरोड | प्रतिनिधी
नाशिकरोड येथील बिझनेस बँकेतील रिक्त असलेल्या संचालक पदांसाठी पार पडलेल्या निवड प्रक्रियेत चारही उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे बँकेच्या प्रशासनाला स्थैर्य मिळणार असल्याचे मानले जात आहे.
सर्वसाधारण प्रवर्गातील तीन आणि अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील एक अशा एकूण चार जागांसाठी ही निवड प्रक्रिया राबविण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजीव इप्पर यांनी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडली.
या प्रक्रियेनंतर रणजित नगरकर, प्रकाश पाटील, कल्पेश लोया, विकास पगारे यांची संचालकपदी एकमताने निवड जाहीर करण्यात आली.
निवडीनंतर बँकेच्या प्रगतीसाठी नवे उपक्रम राबविण्याचा आणि ग्राहकाभिमुख सेवा अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष विजय संकलेचा, उपाध्यक्ष डॉ. उमेश नगरकर, ज्येष्ठ संचालक मोहन लाहोटी, अशोक तापडिया, विजय चोरडिया, डॉ. पी. एफ. ठोळे, पुरुषोत्तम फुलसुदंर, मनोहर केसर, घोडके, अॅड. गोरख बलकवडे तसेच बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

digitalnashik_admin




