डॉक्टर शहाणे बंधूंचा गौरवपूर्ण सत्कार

नाशिक (प्रतिनिधी): महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमासाठी तब्बल 20 क्रमिक पुस्तके लिहून शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्याबद्दल डॉ. राजेंद्र शहाणे आणि डॉ. कृष्णा शहाणे या शहाणे बंधूंचा सत्कार करण्यात आला.
हा सत्कार संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली येथील मुख्य वनसंरक्षक अनिता पाटील-चव्हाण (आय.एफ.एस.) यांच्या हस्ते संपन्न झाला.
नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बँकेच्या १०५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित गुणगौरव समारंभात शहाणे बंधूंच्या कार्याची दखल घेत विशेष गौरव करण्यात आला.
उपस्थित मान्यवर
या कार्यक्रमाला बँकेचे अध्यक्ष निलेश देशमुख, उपाध्यक्ष धनश्री कापडणीस, तसेच संचालक मंडळातील सर्व सदस्य—
प्रमोद निरगुडे, अजित आव्हाड, मंदाकिनी पवार, महेश मुळे, सुनील गीते, रवींद्र बाविस्कर, मोहन गांगुर्डे, ज्ञानेश्वर माळोदे, जयंत शिंदे, विजय देवरे, रमेश बोडके, अभिजीत घोडेराव, सचिन विंचुरकर, विक्रम पिंगळे, अमोल बागुल, विनोद जवागे, भरत राठोड,
मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद आढे, व्यवस्थापक अण्णासाहेब बडाख, माजी संचालक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.