बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे शेतकरी महिलांना मार्गदर्शन

बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे शेतकरी महिलांना मार्गदर्शन

वडागळी (ता. सिन्नर)
बँक ऑफ महाराष्ट्र वडागळी शाखा, आर्थिक साक्षरता केंद्र नाशिक व उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने सोमठाणे येथील शेतकरी महिलांसाठी “शेळीपालन व्यवसाय” या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

या कार्यशाळेत वडागळी येथील वैशाली गोधडे (शेळी व्यावसायिक व कृषी सखी) यांनी शेळीपालन हा व्यवसाय कसा सुरू करता येतो, शेतीसोबत महिला कशा प्रकारे हा पूरक व्यवसाय करून आर्थिक सक्षम होऊ शकतात, याविषयी अनुभवाधारित मार्गदर्शन केले.

यावेळी उमेद अभियान गाव CRP संपदा धोकरट यांनी सूत्रसंचालन केले. बँक ऑफ महाराष्ट्र वडागळी शाखेचे व्यवस्थापक मयुर शेटे यांनी प्रस्तावना मांडली तर आर्थिक साक्षरता सल्लागार अनुराधा लोंढे यांनी आर्थिक साक्षरता व नियोजन याविषयी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास ग्रामसेवक प्रमोद शिरोळे यांनी आभार मानले. तसेच ग्रामपंचायत सदस्य दयाराम कोकाटे, महेंद्र कोकाटे, कचेश्वर कोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामसंघ अध्यक्षा प्रतिभा धोकरट, सचिव नंदा कसेकर तसेच महिला वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यशाळेचा लाभ घेतला.