नांदगाव येथे जन शिक्षण संस्थान नासिकच्या प्रशिक्षणार्थीं बनविलेल्या बेकरी उत्पादनाकरिता क्लस्टर बनविण्याचा संचालक राहुल ठाकरे यांचा मानस

नासिक-
मराठा विद्या प्रसारक समाज संचलित जन शिक्षण संस्थान, नासिक अंतर्गत नांदगाव येथे फुड प्रिझव्हेशन/बेकिंग प्रशिक्षणाचे उद्घाटन प्रसंगी बोलताना नांदगाव येथे उत्पादित होणाऱ्या वस्तू व प्रशिक्षणार्थींनी तयार केलेल्या वस्तू यांना चांगल्या दर्जाची बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी नांदगाव येथेच क्लस्टर निर्मिती करण्यात येईल असे आश्वासन संचालक राहुल ठाकरे यांनी केले. बेकरी उत्पादन करताना स्वच्छता आरोग्याची काळजी घ्यावी. याकरिता प्रशिक्षणार्थींना किट वाटप करण्यात आले
यावेळी जन शिक्षण संस्थान नाशिकचे संचालक राहुल ठाकरे कार्यक्रम अधिकारी संदीप शिंदे कार्यक्रम अधिकारी संगीता देठे प्रशिक्षणार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मार्गदर्शक शिक्षक सुज्योत मेगनार ह्यांनी केले. कार्यक्रम यशस्वी ते करिता जन शिक्षण संस्थान, नाशिकचे सर्व कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले. या वेळी फुड प्रिझव्हेशन च्या प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.