नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे कला व वाणिज्य महाविद्यालय सिन्नर येथे संविधान दिन साजरा
 
                                नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे कला व वाणिज्य महाविद्यालय सिन्नर येथे राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळ व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा सुनील गूरुळे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना संविधान दिनाविषयी माहिती सांगितली.तसेच संविधान जनजागृती ची गरज या विषयावर विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.राजश्री बागुल, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा महेश शिंदे, मराठी विभाग प्रमुख प्रा.कावेरी गोसावी, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.वर्षा गरगटे तसेच इतर सहकारी प्राध्यापक उपस्थित होते.
 
                        
 digitalnashik_admin
                                    digitalnashik_admin                                 
                    
                 
                    
                 
                    
                 
                    
                 
                    
                 
                    
                 
                    
                

 
    
             
    
             
    
             
    
             
    
             
    
            

 
    
 
    
 
    
 
    
 
    
 
         
         
        