सगुणा बहुउद्देशीय संस्था नाशिक. व सगुणा महिला मंच नाशिक. पी. डी गांगुर्डे सोशल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न

"नाशिक होम मिनिस्टर खेळ पैठणीचा
सगुणा बहुउद्देशीय संस्था नाशिक. व सगुणा महिला मंच नाशिक. पी. डी गांगुर्डे सोशल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने
"नाशिक होम मिनिस्टर, खेळ पैठणीचा" या कार्यक्रमा प्रसंगी
नाशिकच्या बहिणीचा लाडका भाऊजी श्री. संतोषजी फासाटे यांनी सर्व महिलां सोबत नाच, गाणी, धम्माल, मस्ती मज्जा करून मुलांसाठी स्पर्धा घेतल्या व खास मनोरंजनाची लयलूट करून दिली गेली. या मजेशीर स्पर्धांमध्ये होम मिनिस्टर या स्पर्धेसाठी तिन पैठणी तसेच इतरही भरघोस आकर्षक बक्षिसे आणि लकी ड्रॉ कूपने महिलांनी अनेक बक्षिसे जिंकली.
सर्व बक्षिसे खालील मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. डॉक्टर सागर मोरे. सुनंदा गांगुर्डे, डॉक्टर सुनिता खरे, डॉक्टर रेश्मा घोडेराव, अर्चनाताई थोरात, भारतीताई पाटील, सुरेखा वाघ, सिमा पवार, सौ कटारे, अनिता भामरे, वंदना नागवंशी, प्रतिभा म्हस्के यांच्या हास्ते देण्यात आली.
कार्यक्रमाचे आभार प्रवज्जाताई गांगुर्डे व सौ. मनिषा काळे, रुचा गांगुर्डे यांनी मांडले.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती सोना बहुउद्देश संस्थेचे अध्यक्ष राजेश गांगुर्डे सेक्रेटरी दीपक कटारे, ॲड. पी डी काळे तसेच संजय खरे, सुधीर गायकवाड, लबीब मुला, प्रसाद नागवंशी, मनिष कुलकर्णी व महाराष्ट्राची शान ग्रुप, जागृती हास्य क्लब, नंदिनी हास्य क्लब, सोमेश्वर बहुउद्देशीय संस्था, परिसस्पर्श महिला मंच, माननीय महिला मंच, काठे गल्ली व द्वारका परिसरातील महिला या मोठ्या संख्येने सहभागी होऊन उपस्थित होत्या...