प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे यांना राष्ट्रीय पातळीवरील साहित्य भूषण पुरस्कार प्रदान

प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे यांना राष्ट्रीय पातळीवरील साहित्य भूषण पुरस्कार प्रदान

नाशिक (प्रतिनिधी) आर. एन. सी. आर्ट्स जे. डी. बी. कॉमर्स अँड एन. एस. सी. सायन्स कॉलेज नाशिक रोड येथील प्रभारी प्राचार्य डॉ. कृष्णा शंकर शहाणे यांना 

साप्ताहिक गंगाधर आणि साहित्य परिषद कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा राष्ट्रीय पातळीवरील साहित्यभूषण पुरस्कार नुकताच ज्येष्ठ साहित्यिक विजय जोशी यांचे हस्ते आणि साहित्य संमेलनाचे संयोजक कमलाकर वर्टेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.  

कोल्हापूर येथे झालेल्या राष्ट्रीय परिसंवाद आणि राष्ट्रीय साहित्य संमेलनात सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

डॉ.शहाणे हे  अर्थशास्त्र आणि शेती या विषयातील जाणकार असून एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या 15 आणि एकूण 19 क्रमिक पुस्तकांचे ते लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी सदर पुरस्कार आपल्या प्रतिनिधी मार्फत स्वीकारला असून ते मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स मुलुंड मुंबई, के.टी. वझे केळकर कॉलेज मुंबई, गुरुनानक खालसा कॉलेज मुंबई या विद्यापीठ दर्जा असलेल्या स्वायत्त महाविद्यालयांच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळाच्या सदस्य पदी (B.O.S.) कार्यरत आहेत आणि  त्यांचा अभ्यासक्रम तयार करण्याच्या कार्यात त्यांचा सहभाग आहे.

आर्थिक घडामोडी, शेती समस्या या विषयावरील ते स्तंभ लेखक आहेत.  दैनंदिन वर्तमानपत्रे साप्ताहिके आणि नियतकालिके यातून अर्थ आणि शेती तसेच चालू घडामोडी या  विषयावरील त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झालेले आहेत. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रातून त्यांनी शोध निबंध सादर केलेले आहेत याशिवाय आकाशवाणीवरून अर्थ विषयावर त्यांची अनेक व्याख्याने प्रसारित झालेली आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठातून नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादन आणि विपणनाचे अर्थशास्त्र या विषयात पीएच.डी. पदवी संपादन केलेले आहे. 

त्यांच्या निवडीबद्दल गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सेक्रेटरी प्राचार्य डॉ.सौ. दीप्ती देशपांडे, संस्थेचे अध्यक्ष श्री आर. पी. देशपांडे, श्री.शैलेशजी गोसावी, श्री. कल्पेशजी गोसावी, विभागीय सचिव प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, संस्थेचे कुलसचिव श्री गिरीश नातू, शाखा सचिव प्राचार्य डॉ. व्ही. एन.  सूर्यवंशी, सहाय्यक शाखा सचिव उपप्राचार्य डॉ. प्रणव रत्नपारखी आदींसह अनेकांनी अभिनंदन केले आहे.