द्वारका ते मुंबई नाका परिसरात अतिक्रमणावर मोठी कारवाई
नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज द्वारका ते मुंबई नाका परिसरात मोठी अतिक्रमण विरोधी मोहीम राबवली. मुख्य रस्ता आणि सर्विस रोडवरील रहदारीस अडथळा ठरणाऱ्या ८८ अतिक्रमित आस्थापनांवर संयुक्त कारवाई करण्यात आली.
या कारवाईदरम्यान शेड, ओटे, टपऱ्या काढण्यात आल्या तसेच अडथळा निर्माण करणाऱ्या वस्तू जप्त करून रस्ता वाहतुकीस मोकळा करण्यात आला.
ही कारवाई सकाळी १० वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत पोलीस विभाग व महापालिकेच्या सहकार्याने राबविण्यात आली. या मोहिमेसाठी २ जेसीबी, ४ ट्रक आणि ६ विभागांचे कर्मचारी कार्यरत होते.
कारवाईचे मार्गदर्शन आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री, पोलीस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी, अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे,अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे
तसेच राजाराम जाधव, चंदन घुगे, जयश्री बैरागी, मदन हरिश्चंद्र यांच्यासह नगररचना, बांधकाम आणि वाहतूक विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.
अतिक्रमण टाळा - कारवाईला सामोरे जावे लागू शकते!
नागरिकांनी पुढे यापुढे कोणतेही अतिक्रमण टाळावे, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशारा अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी दिला आहे.