श्री सप्तश्रुंगी महाविद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी.
* तुळजाभवानी एज्युकेशन सोशल अँड वेल्फेअर सोसायटी संचलित श्री सप्तशृंगी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दिनांक 23 जुलै 2025 रोजी लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली.ह्या कार्यक्रमाला प्रमुख अध्यक्ष प्रा. जाधव पी. एम हे होते तर प्रमुख अतिथी प्रा. सुरेखा जगताप ह्या होत्या, तसेच प्रमुख अतिथी प्राध्यापिका सुरेखा ह्यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवनावर मार्गदर्शन केले,व ह्या कार्यक्रमात
लोकमान्य टिळक ह्यांचा गौरव करण्यासाठी येथे जमलो 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' असा निर्धार व्यक्त करत, भारतीयांमध्ये देशभक्तीची भावना जागृत टिळकांनी केली.असे अध्यक्ष भाषणात प्राचार्य जाधव सर यांनी सांगितले. तसेच प्रा. नाडेकर आर. डी यांनी लोकमान्य टिळक क्रांतीकारी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता, वकिल व भारतीय सेनानी देखील होत. ब्रिटीश अधिकारी त्यांना भारतीय अशांततेचे जनक म्हणत.असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राधिपिका रीना बाविस्कर यांनी केले तर आभार प्रा. लोटन जाधव यांनी मांडले. कार्यक्रमासाठी कोमल भांगरे,प्रा.सोनवणे कोमल, प्रा.भांगरे कोमल प्रा.हर्षल जगताप प्रा.जितेंद्र सावंत, प्रा.दिशा, जाधव, प्रा.शशिकांत बच्छाव, श्री. आहेर एस. टी, श्री. बागुल मोहन, श्री.जाधव विजय, श्री.जगदीश भामरे श्री.करण बिरारी श्री.भाग्येश देशमुख विद्यार्थी व राष्ट्रीय योजना स्वयंसेवक हजर होते.

digitalnashik_admin




