बिटको महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्सहात संपन्न ....

नाशिकरोड:_ गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात बुधवार दि. १ मे रोजी स. ८ वा. महाविद्यालयाच्या जिमखाना ग्राउंड वर महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न झाला . महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.कृष्णा शहाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले .या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पठारे , डॉ.आकाश ठाकूर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे, सर डॉ. मो. स. गोसावी तंत्रनिकेतनच्या प्राचार्या डॉ.श्रद्धा देशपांडे, एन एस एस कार्यक्रम अधिकारीडॉ. संतोष पगार, एनसीसी लेफ्टनंट डॉ. विजय सुकटे, प्रा. दीपक टोपे, विद्यार्थी सभा कार्याध्यक्ष डॉ. लक्ष्मण शेंडगे, सुहास माळवे, राहुल पाटील, योगेश महाजन,रजिष्ट्रार राजेश लोखंडे तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आदी उपस्थित होते .
याप्रसंगी प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करुन महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या . तसेच महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी १०६ हुतात्म्याने बलिदान दिले आहे तसेच कामगारांच्या हक्कांसाठी व न्यायासाठी झालेल्या चळवळीचा हा स्मरण दिन आहे. अनेक साहित्य कवींनी महाराष्ट्राचे वर्णन केले आहे. महागाई व बेरोजगारी कमी व्हावी. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी काळजी घ्यावी. मोबाईलचा वापर चांगल्या कामासाठीच करा. व्यसनाधीनातेकडे वळू नका असे सांगितले.