रविवारी पसा मध्ये आशात्मजा आणि वसंतकल्प राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण....

रविवारी पसा मध्ये आशात्मजा आणि वसंतकल्प राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण....

नाशिक :-  आत्मजा वसंत फाउंडेशन वतीने रविवार दि. २९ मार्च रोजी परशुराम सायखेडकर नाट्यगृहात दुपारी ११.३० वाजता विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या महिला आणि पुरुष यांना आशात्मजा आणि वसंतकल्प राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. याप्रसंगी सन्माननीय अतिथी म्हणून नाशिक महानगरपालिकेच्या महापौर हिमगौरी आडके यासह मॉडेल प्रिया कणेरी, मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या सुजाता इळवे, योगशिक्षिका शैलजा ब्राह्मणकर, सनशाईन स्कूलच्या संचालिका स्वाती निकम, विश्वशांती हास्ययोग केंद्राच्या अध्यक्षा जयश्री गावित, मुंबई येथील हिरकणी सर्विसेसच्या उद्योजिका हिरा पवार, सामाजिक कार्यकर्त्यां रीमा गुलाटी, समानता लोंढे तर विशेष अतिथी म्हणून नंदुरबार येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा मेटकर तसेच रेडिओ आर जे सतरंगी रुचा शहा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी सदाबहार गीत व एकपात्री सादरीकरणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी रसिकांनी या पुरस्कार सोहळ्यासाठी व गीतांचा आनंद घेण्यासाठी अवश्य उपस्थित राहावे असे आत्मजा वसंत फाउंडेशनच्या अध्यक्षा व आयोजिका सौ. नूतन मिस्त्री यांनी कळवले आहे.