सहाय्यक प्राध्यापिका पूनम रविशंकर कुटे यांना इंटरनॅशनल टीचर एक्सलन्स अवॉर्ड
शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्राध्यापिका पूनम रविशंकर कुटे यांना त्रेता युग फाउंडेशन तर्फे “इंटरनॅशनल टीचर एक्सलन्स अवॉर्ड” प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांच्या उत्कृष्ट अध्यापन पद्धती, विद्यार्थीकेंद्री उपक्रम, तसेच शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन जाहीर करण्यात आला.
पूनम कुटे या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे.विद्यार्थ्यांमध्ये वाचन, लेखन, वक्तृत्व आणि सर्जनशीलतेची आवड निर्माण करण्यासाठी त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे आयोजित केले आहेत.
या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याचा गौरव झाला असून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी त्या प्रेरणास्थान ठरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल के. व्ही. एन. नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. कोंडाजी मामा आव्हाड यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे सरचिटणीस मा. श्री. हेमंत आप्पा धात्रक व संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. उदयभाऊ घुगे , संस्थेचे सरचिटणीस दिगंबर नाना गीते यांनीही त्यांचे अभिनंदन केले. तसेच स्थानिक संचालक मंडळ विश्वस्त मा. श्री. नामदेव काकड साहेब, संचालक मा. श्री. समाधान गायकवाड साहेब, संचालक मा. श्री. जयंतबाबू आव्हाड साहेब, संचालक मा. श्री. हेमंत नाईक साहेब, महिला संचलिका सौ.नंदाताई बंडूनाना भाबड, संचालक प्रतिनिधी मा. श्री. बंडूनाना भाबड साहेब व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.

digitalnashik_admin




