डॉ. मंगल सांगळे यांचा के. व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सत्कार!

डॉ. मंगल सांगळे यांचा के. व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सत्कार!

के. व्ही. एन. नाईक शिक्षण संस्था नाशिकचे अध्यक्ष मा. श्री. कोंडाजी मामा आव्हाड यांनी डॉ. मंगल सांगळे यांना जाहीर झालेल्या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संस्थेचे सरचिटणीस मा. श्री. हेमंत आप्पा धात्रक व संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. उदयभाऊ घुगे यांनीही अभिनंदन केले. तसेच विश्वस्त मा. श्री. नामदेव काकड साहेब, संचालक मा. श्री. समाधान गायकवाड साहेब, संचालक मा. श्री. जयंतबाबू आव्हाड साहेब, संचालक मा. श्री. हेमंत नाईक साहेब व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले यांनीही डॉ. मंगल सांगळे यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. 

सिन्नर येथील प्रसिद्ध कवयित्री लेखिका, पत्रकार  तसेच तरुप्रीत प्रकल्पाच्या संचालिका, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सिन्नरच्या कोषाध्यक्ष व के. व्ही. एन. नाईक महाविद्यालय सिन्नर येथे मराठी विभाग प्रमुख व राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. मंगल कचरू सांगळे यांना शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानच्या वतीने पर्यावरण, साहित्य, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात करत असलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल राज्यस्तरीय विशेष सन्मान पुरस्कार २०२६ जाहीर झाला आहे. गेल्या  सात वर्षांपासून तरुप्रीत प्रकल्पाच्या माध्यमातून ओसाड माळरानावर हिरवळ फुलवून २० हजारांहून अधिक बीजारोपण व २५०० हुन अधिक वृक्षारोपण करून निसर्ग संवर्धनाचे काम अविरतपणे करणाऱ्या डॉ. मंगल सांगळे ह्या उत्तम कवयित्री व लेखिका असून सातत्याने लिखाण करून मराठी साहित्यात महत्वपूर्ण काम करत आहेत. तसेच गेल्या वर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून त्यांनी पीएच. डी. पदवी संपादन केली आहे. मराठी विषयात सलग पाच वेळा नेट परीक्षा व एकदा सेट परीक्षा उत्तीर्ण होण्याचे रेकॉर्ड देखील त्यांच्या नावावर आहे. त्यांना या सर्व क्षेत्रातील कार्याबद्दल भारतरत्न मदर तेरेसा गोल्ड मेडल अवॉर्ड २०२० हा राष्ट्रीय पुरस्कार व १३ हुन अधिक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. 

सदर पुरस्काराचे वितरण ४ जून २०२६ रोजी पिंपळगाव जलाल, ता. येवला येथे होणाऱ्या शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार प्रदान सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे अशी माहिती वाघ प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय वाघ व सदस्य प्रशांत वाघ यांनी दिली.