मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते बाळासाहेबांची शिवसेना कार्यालयाचे उदघाटन

मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते बाळासाहेबांची शिवसेना कार्यालयाचे उदघाटन

मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते बाळासाहेबांची शिवसेना कार्यालयाचे उदघाटन

लाडके मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य नेते मा. एकनाथजी शिंदे साहेबांच्या शुभहस्ते शुक्रवारी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचा उदघाटन सोहळा पार पडला.

गंजमाळ सिग्नलजवळ, जीपीओ पोस्ट ऑफिससमोर बाळासाहेबांची शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा उदघाटन सोहळा दिमाखात पार पडला. लाडके मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य नेते मा. एकनाथजी शिंदे साहेबांच्या शुभहस्ते आणि पक्ष सचिव मा. संजय माशीलकर साहेब, पालकमंत्री मा. दादासाहेब भुसे साहेब, संपर्क प्रमुख मा. जयंत साठे साहेब, खासदार मा. हेमंत अप्पा गोडसे, आ. सुहास (अण्णा) कांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उदघाटन सोहळा पार पडला. 

याप्रसंगी, ग्रामीण जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, अनिल ढिकले, महिला आघाडी जिल्हा संघटक लक्ष्मीताई ताठे, महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे, युवासेना जिल्हाप्रमुख योगेश म्हस्के, सदानंद नवले आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.