नाशिक जिल्हा मराठी अध्यापक संघ नाशिक च्या वतीने जागतिक मराठी भाषा गौरव दिन निमित्ताने डॉ. छाया भास्कर भोज यांना कविवर्य कुसुमाग्रज सन्मान प्रदान

नाशिक जिल्हा मराठी अध्यापक संघ नाशिक च्या वतीने जागतिक मराठी भाषा गौरव दिन निमित्ताने डॉ. छाया भास्कर भोज यांना कविवर्य कुसुमाग्रज  सन्मान प्रदान
कविवर्य कुसुमाग्रज सन्मान डॉ. छाया भास्कर भोज यांना सन्मान प्रदान करताना बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे व मविप्र सभापती बाळासाहेब क्षीरसागर, व्यासपीठावर श्रीराम शेटे साहेब, अध्यक्ष सुरेश सलादे, सरपंच किरण काळे, भालेराव साहेब, लक्ष्मीबाई आदी.
 नाशिक जिल्हा मराठी अध्यापक संघ नाशिक च्या वतीने   (कविवर्य कुसुमाग्रज जयंती) जागतिक मराठी भाषा गौरव दिन निमित्ताने आपल्या अखीवरेखीव व भरीव आणि सामाजिक शैक्षणिक उपक्रमशीलतेला मानाचा मुजरा करीत संघाच्या वतीने दिला जाणारा कविवर्य कुसुमाग्रज सन्मान मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पिंपळगाव बसवंत येथील इतिहास विभागातील डॉ. छाया भोज यांना बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे व मविप्र सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, सरचिटणीस ॲड. नितीनजी ठाकरे, चिटणीस दिलीप दळवी, निफाड तालुका संचालक शिवाजी गडाख, महिला संचालक श्रीम. शोभा बोरस्ते, स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष रविंद्र मोरे, सुनिल पाटील व सर्व सदस्य, मविप्र शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे, उपप्राचार्य दिलीप माळोदे, सर्व शिक्षक - शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.