बिटको महाविद्यालयाचे शिक्षक श्री संजय परमसागर प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त....
नाशिकरोड :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालय एच एस सी व्होकेशनल विभागातील पूर्ण वेळ शिक्षक (प्रात्यक्षिक ) श्री. संजय परमसागर हे नियत वयोमानानुसार दि. ३१ ऑक्टोबर रोजी एकूण २६ वर्षे ४ महिन्यांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त सेवापूर्ती गौरव समारंभ विविध क्षेत्रातील मान्यवर, परमसागर कुटुंबीय, नातेवाईकांसोबत कुलकर्णी मंगल कार्यालय नाशिकरोड येथे आयोजित करण्यात आला होता.

श्री. संजय परमसागर यांनी आपल्या कार्यकाळात त्यांनी महाविद्यालयात शैक्षणिक अध्यापनाबरोबरच विविध उपक्रमात सहभाग घेतला. सांस्कृतिक विभाग प्रमुख, प्रेस आणि मीडिया प्रसिद्धीप्रमुख, महाविद्यालय वार्षिक अंक प्रकाशन सदस्य, विद्यार्थी सभा सदस्य, वार्षिक पारितोषिक वितरण प्रमुख अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पडल्या. याबरोबरच आपल्या गायनकलेचा छंद जोपासत विविध क्लबच्या माध्यमातून विविध ठिकाणी गायन कौशल्य सादर केले. तसेच सामाजिक क्षेत्रातही योगदान मोठे आहे. अनेक पुरस्कार यात बेस्ट टीचर पुरस्कार, भटके विमुक्त भूषण पुरस्कार, राष्ट्रीय समरसता पुरस्कार, राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत .

सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाप्रसंगी गोखले एज्युकेशन सोसायटीचे विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी, ब्रांच सेक्रेटरी डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी, प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे, उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पठारे, डॉ. आकाश ठाकूर, डॉ. सतीश चव्हाण, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रणाली पाथरे, पर्यवेक्षिका आर. एस. पाटील, राजराजेश्वरी प्रतिष्ठानचे संस्थापक व माजी जिल्हाधिकारी रघुनाथ राठोड, प्रा. राजेंद्र जोगी , प्रा.डॉ. सुरेखा जोगी, निखिलनाथ जोगी, प्रा. मनीषा देशमुख, राहुलनाथ वसावे, कृष्णानाथ वाघ ( जळगाव ), सौ. प्रतिभा चव्हाण, डॉ. माधुरी जाधव, अजय जाधव (पुणे), कोमल मेहेरॉलिया, आर. डी. धोंगडे, अतुल धोंगडे,गणेश जाधव, चिनावल येथील काका -भोजुनाथ व परमसागर परिवार, कु.जिज्ञासा शिंदे, कु. स्नेहल भालेराव, कु.निर्मिती वैद्य, कु.आर्या यांनी मनोगते व्यक्त करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यकमास कनिष्ठ व महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच विविध कराओके क्लबचे संयोजक प्रमोद कापडणे, मोनादीदी , मनोज दीक्षित, राजन गायकवाड, रुपेश शिंपी यासह गायक, शैक्षणिक,,सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर यांनी दीर्घायुष्य व भावी वाटचालीस तसेच उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश गोविल यांनी केले तर संयोजन व सर्व उपस्थितांचे स्वागत तेजस परमसागर याने करून प्रास्ताविक केले. यावेळी श्री संजय परमसागर यांच्या कार्यकाळ वाटचालीतील चित्रफित दृकश्राव्य माध्यमाद्वारे उपस्थितांना दाखवण्यात आली. सर्व उपस्थितांचे आभार शुभम परमसागर यांनी मानले. सुरेश कापरे यांनी ध्वनीव्यवस्था सांभाळली.

Rupali_shinde




