बिटको महाविद्यालयाचे हिंगणवेढे येथे विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन संपन्न...

नशिकरोड : " नाशिकरोड महाविद्यालय हिरक महोत्सवी वर्षे साजरे करत असून राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्य ' नॉट मी बट यु ' यावर चालते. सम्पूर्ण टीमवर्कने शिबीर यशस्वी होऊन यातून ग्रामीण समाजजीवन समस्या सोशल कोशन्ट, जवळून न्याहाळता येतात.समजमन कळते. यातून नवीन दिशा मिळते. विविध उपक्रम व तज्ञ व्यक्तींच्या व्याख्यानातून ऊर्जा व ज्ञानप्राप्ती होते. एकत्र काम केल्याने मैत्रीभावना, सहकार्य यातून समजसेवेचा वसा मिळतो. आपले व्यक्तिमत्व घडते. स्वओळख होते, " असे डॉ. प्रणव रत्नपारखी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना केले
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील चांडक बिटको चांडक महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागावतीने विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर दि. २७ जानेवारी २०२५ ते २ फेब्रुवारी २०२५ या दरम्यान हिंगणवेढे, ता. व जि. नाशिक येथे ' युथ फॉर माय भारत व युथ फॉर डिजिटल लिटरसी ' अंतर्गत आयोजित करण्यात आले आहे. शिबीराचे उद्घाटन दि.२७ जानेवारी रोजी करण्यात आले. सदर शिबिराचे उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या प्रो.डॉ. मंजुषा कुलकर्णी, प्रमुख अतिथी एच. पी. टी. महाविद्यालयाचे उपप्राचार्य व नाशिकरोड सेंटरचे सहायक शाखा सचिव डॉ.प्रणव रत्नपारखी , कला शाखेचे उपप्राचार्य डॉ.अनिलकुमार पठारे, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ .के सी टकले , राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोष पगार, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. कांचन सनानसे, प्रा ज्योती पेखळे ,p0 प्रा. सुजाता टोचे, प्रा. गायत्री हरळे, विद्यार्थी सभा कार्याध्यक्ष सहा. प्रा. लक्ष्मण शेंडगे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. दीपक टोपे , प्रा. नरेश पाटील, डॉ. विजय सुकटे, डॉ. विजय सुकटे, हिंगणवेढे गावचे सरपंच सरपंच सौ ज्योती कृष्णा नागरे, सुनील वाघ, श्री. कृष्णा नागरे, ग्राम विकास अधिकारी ज्ञानेश्वर भोर, योगेश क्षीरसागर, विरुदादा क्षीरसागर, सचिन आव्हाड, प्रा. संदीप हिरगड सर, संजय परमसागर यांच्यासह हिंगणवेढे गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. चंद्रकांत तारू यांनी प्रमुख मान्यवरांचा परिचय करून दिला.
तसेच याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर भोर यांनी मार्गदर्शन करतांना या शिबिरातून मला काय मिळाले त्याचा उपयोग भविष्यात कसा होईल यावर मन्थन करा असे सांगितले.सदर दिवशी सहा. प्रा. नरेश पाटील यांचे ' राष्ट्र उभारणीत युवकांचा सहभाग 'या विषयावर व्याख्यान झाले. कार्यक्रमाचे प्रास्तविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोष पगार यांनी शिबिरात होत असलेल्या जलसंवर्धन, जलस्रोत स्वच्छता, डिजिटल साक्षरता लोकसंख्या नियंत्रण जनजागृती, मतदार जनजागृती व लोकशाही, महिला सबलीकरण, व्यसनमुक्ती, लिंगभाग संवेदनशीलता, नेत्र तपासणी व विविध सर्वेक्षण आदी उपक्रमांबद्दल माहिती दिली. प्राचार्य डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी राष्ट्रउभारणीत एनएसएस स्वयंसेवकाचे योगदान मोलाचे असून कर्तव्यातून आनंद मिळण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ असून व्यक्तिमत्व विकास साध्य होऊन गावातील संस्कृती समजेल असे मनोगत व्यक्त केले . सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ.सुधाकर बोरसे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. कांचन सनानसे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले .