क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण  प्रसारक संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान  महाविद्यालय सिन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण  प्रसारक संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान  महाविद्यालय सिन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त नामदेव काकड  व संस्थेचे संचालक समाधान गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. समाधान गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण  व त्यांचे दातृत्व ,कर्तृत्व व कार्य किती महान आहे हे सांगितले  तसेच महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख स. प्रा. अमोल आव्हाड व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पखाले के.डी यांनी देखील आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स प्रा स्वाती चोथवे यांनी केले व आभार स.प्रा.ज्ञानेश्वर चकोर यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील परीक्षा विभाग प्रमुख प्रा. संतोष आव्हाड, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. पूनम कुटे, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. मंगल सांगळे तसेच इतर प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.