बिटको महाविद्यालयात महात्मा जोतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी....

 बिटको महाविद्यालयात महात्मा जोतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी....

नाशिकरोड:_"महात्मा जोतिबा फुले मराठी लेखक, प्रसिद्ध विचारवंत व समाजसुधारक होते . शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून  पुरोगामी विचारांची मांडणी करून महाराष्ट्रात   स्त्रियांसाठी  शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली, त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी  आहे," असे मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे यांनी केले .

         गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात महात्मा जोतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.  .प्रारंभी महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन विनम्र अभिवादन करण्यात आले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. दीपक टोपे यांनी केले .सूत्रसंचालन डॉ.सुधाकर बोरसे  . कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. कल्याणराव टकले डॉ अनिल कुमार पठारे, डॉ. आकाश ठाकूर ,डॉ. विलास कांबळे , डॉ. लक्ष्मण शेंडगे, डॉ. शशिकांत साबळे, डॉ. अनिल सावळे, कुलसचिव राजेश लोखंडे तसेच प्राध्यापक व विद्यार्थी आदी उपस्थित होते .