बिटको महाविद्यालयात महिला सबलीकरण मंच आणि अभिमुखता कार्यशाळा सम्पन्न...
नाशिकरोड : " शिक्षण व प्रत्येक काम, गोष्ट समर्पण भावनेने केल्यास कोणतीही अडचण येत नाही. त्यासाठी ध्येयधोरण प्रचंड मेहनत आणि संयम चिकाटी आवश्यक आहे.व्यवसाय, उद्योग सुरू करताना वेळ नियोजन बाजार आणि आर्थिक परिस्थिती , प्रॉडक्टला मागणी आदी बाबींचा अभ्यास करणे आवश्यक आहे.तसेच वेगळी वैशिष्ट्ये काय त्याचे महत्त्व पटवून देण्याची कला अवगत असणे आवश्यक आहे, " असे मार्गदर्शन करताना AVS Technologies तंत्र मार्गदर्शक विलास खरे यांनी केले.
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात कॉमर्स विभाग व आयक्यूएसी वतीने आयोजित ' महिला सबलीकरण आणि अभिमुखता ' याविषयावर आयोजित कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर AVS Technologies चे संचालक विनोद बर्वे, प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. के. सी. टकले, डॉ. अनिलकुमार पठारे, डॉ. आकाश ठाकुर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहा. प्रा. वंदना शेवाळे यांनी केले. याप्रसंगी विनोद बर्वे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ज्या विद्यार्थिनींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी डेटा विश्लेषण, भांडवल कसे उभारावे , व्यवहार ज्ञान व इतर आवश्यक गोष्टीबाबत ट्रेनिंग आयोजना बाबत माहिती दिली. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी सांगितले की, " विद्यार्थिनींनी कष्ट करण्याची तयारी ठेवा, स्पर्धा खूप आहे, त्यासाठी सक्षम व सबल व्हा, वेळोवेळी संशोधन करा तसेच संवाद कौशल्य आत्मसात करा,"असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.कांचन सनानसे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अश्विनी घनबहादुर, प्रा. वंदना शेवाळे,सहा.प्रा. कांचन निकम, सहा प्रा. ज्योती पेखळे यांनी परिश्रम घेतले.