क.का.वाघ पिंपळगाव बसवंत महाविद्यालयात इस्रोची बसचे उत्साहात स्वागत

क.का.वाघ पिंपळगाव बसवंत महाविद्यालयात इस्रोची बसचे उत्साहात स्वागत
पिंपळगाव बसवंत-1.12.2024 रविवार
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) यांची स्थापना 15 ऑगस्ट 1969 रोजी झाली. इस्रो ने आतापर्यंत अनेक अवकाशातील यशस्वी मोहिमा केलेले आहेत. यामध्ये चांद्रयान, मंगलयान, आदित्य, एल १, असे नवनवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. त्यांची यशस्वी वैज्ञानिक प्रगती इस्रोच्या चार भिंतीत मर्यादित न राहता सर्वसामान्य जनतेपर्यंत  पोहोचावी म्हणून "स्पेस ऑन व्हील्स " ही विशेष बस भारतभर प्रवास करत नाशिकच्या दौऱ्यावर आहे. रविवार दि. 1 डिसेंबर 2024 रोजी ही बस मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात आली. निफाड तालुक्यातील  शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी उपस्थित होती. या विशेष बसमध्ये इस्रोद्वारा निर्मित विविध प्रेक्षपक, उपग्रह त्यांच्या प्रतिकृती आणि माहिती प्रदर्शित करण्यात आलेली आहे. तसेच भारताच्या मंगलयान,चांद्रयान उपग्रहाचे दळणवळण, दुरुस्त संवेदन ,यांच्या विषयी माहिती दिलेली आहे. इस्रो आणि विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने ही बस महाराष्ट्रभर फिरत आहे. यावेळी विद्यार्थ्याना ह्या उपक्रमाची माहिती  इंजिनियर गणेश सफारीया, विभा साळुंखे यांनी  दिली.

महाविद्यालयात विविध 37 शाळा आणि  महाविद्यालयातील 1700 विद्यार्थ्यांनी आणि 157 शिक्षक प्राध्यापक यानी भेट दिली, तसेच मोठ्या प्रमाणात पालकांनी  भेट देऊन इस्रोचे प्रात्यक्षिक अनुभव व निरीक्षण केले. 
 महाविद्यालयात या बसचे  स्वागत करताना मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, मविप्र संस्थेचे शिक्षणाधिकारी प्रा. डॉ. नितीन जाधव स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष रविंद्र मोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे, उपप्राचार्य दिलीप माळोदे मुख्याध्यापिका शिल्पा धारराव यांनी स्वागत केले. 
 
 सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.डॉ. नरेंद्र पाटील, प्रा भगवान कडलग,डॉ. साहेबराव मोरे, प्रा.अमोल मेहंदळे, प्रा.मंगेश जमदाडे, प्रा. धनंजय कडलग, प्रा. तुषार मोरे, प्रा. नरेंद्र बोरस्ते प्रा.आकाश गायकवाड, प्रा. प्रियंका निकम, प्रा.डॉ. योगिता शेळके, प्रा. सोनाली कदम,  प्रा.शितल अत्रे, प्रा. गायत्री वीर, प्रा, कैलास घुमरे, प्रा.राजेंद्र माने, प्रा. चेतन गागरेपाटील, सेवक कर्मचारी श्री. कार्तिक मोरे आणि इतर सेवक वृंद यांनी परिश्रम घेतले.