के . पी. जी. महाविद्यालयातील प्राध्यापकांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेली कामगिरी वाखाणण्याजोगी आहे, असे प्रतिपादन मविप्र सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनी वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त सांगितले.
इगतपुरी – कुशल शिक्षक हा समाजपरिवर्तनाचा आधारस्तंभ असतो.
केपीजी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर
केलेली कामगिरी वाखाणण्याजोगी आहे, असे प्रतिपादन मविप्र सरचिटणीस
अॅड. नितीन ठाकरे यांनी केले. मराठा विद्या प्रसारक समाजाच्या इगतपुरी
येथील केपीजी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त महाविद्यालयातील
प्राध्यापाकांचा सन्मान करताना अध्यक्ष या नात्याने ते बोलत होते. या प्रसंगी
व्यासपीठावर प्रमुख अतिथी डॉ. गणेश चंदनशिवे, मविप्र उपाध्यक्ष श्री.
विश्वासराव मोरे, मविप्र संचालक अॅड. संदीप गोपाळराव गुळवे, मविप्र
संचालक डॉ. प्रसाद सोनवणे, मविप्र संचालक श्री. विजय पगार, मविप्र संचालक
श्री. रमेश पिंगळे, प्राचार्य डॉ. किरण रकिबे आदी उपस्थित होते.
केपीजी महाविद्यालयाला नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक नवमतदारांची
नोंदणी केल्याबद्दल जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडून ‘उत्कृष्ट
महाविद्यालय पुरस्कार’ मिळाल्याबद्दल प्राचार्य डॉ. किरण रकिबे, डॉ. कल्पना
वाजे, प्रा. एम.एस. मगर यांचा सन्मान अॅड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते
करण्यात आला. तसेच प्राचार्य डॉ. किरण रकिबे यांना अमेरिका व भारत यांच्या
संयुक्त विद्यमाने दिला जाणारा आंतरराष्ट्रीय ‘चाणक्य पुरस्कार’ मिळाल्याबद्दल
व U.K. येथील आंतरराष्ट्रीय पेटंट प्राप्त केल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन
गौरविण्यात आले. त्याचबरोबर प्रा. डॉ. एस.टी. जाधव, प्रा. के.के. चौरसिया,
प्रा. अर्चना भगवान धोंगडे, प्रा. डी.एस. अंतापुरकर या प्राध्यापकांनी राष्ट्रीय व
आंतरराष्ट्रीय पेटंट्स प्राप्त केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन
त्यांचा गौरव केला.
केपीजी महाविद्यालयात दहा किंवा त्याहून अधिक वृक्ष लागवड करून
त्याचे पालकत्त्व स्वीकारून योग्य संगोपन केल्याबद्दल भूगोल व इंग्रजी विभाग
यांना संयुक्तरित्या ‘वृक्षमित्र पुरस्कार’ देण्यात आला. प्रा. संजय भास्कर
फाकटकर यांनी महाविद्यालयातील घडामोडींना बातम्यांच्या माध्यमातून
लोकमानसापर्यंत पोहचविण्याचे कार्य केले, याबद्दल त्यांचा विशेष सन्मान
करण्यात आला. महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या राज्यस्तरीय
पर्यावरणशास्त्र समितीवर सदस्यपदी तसेच महाराष्ट्र राज्य पर्यावरण प्रदूषण
निवारण मंडळावर नाशिक जिल्हा समन्वयकपदी निवड झाल्याबद्दल प्रा.
एन.एस. बोंबले यांचे मान्यवरांनी सन्मानचिन्ह देऊन कौतुक केले. प्रा. श्रेयस
तुकाराम शिंदे यांना भौतिकशास्त्र या विषयाची सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल
सन्मानित करण्यात आले. प्रा. एस.एस. परदेशी यांना एन.सी.सी. अंतर्गत कॅप्टन
पदासाठी प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात शोधनिबंध सादर
केल्याबद्दल तसेच आंतरराष्ट्रीय नियतकालिकात लेख प्रकाशित झाल्याबद्दल
गौरविण्यात आले. याबरोबरच प्रा. लीना देवरे, प्रा. अनिल बचाटे, प्रा. डी.एच.
शेंडे व प्रा. राहुल जयसिंग बहोत यांचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकात
शोधनिबंध प्रकाशित केल्याबद्दल तसेच चर्चासत्रांत शोधनिबंध सादर केल्याबद्दल
प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने गुणगौरव सोहळ्यास उपस्थित पत्रकारांशी
संवाद साधताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण रकिबे म्हणाले की, अनेक
पीएचडीधारक व उच्चशिक्षित प्राध्यापकांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनामुळे केपीजी
महाविद्यालयाचे विद्यार्थी सर्व क्षेत्रांमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करत आहेत व
महाविद्यालयाचे नाव राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल करत आहेत,
ही अभिमानास्पद बाब आहे. प्रगतीची ही घोडदौड यापुढेही अत्यंत वेगाने सुरु
राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
फोटो ओळ : केपीजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण रकिबे यांचा सन्मान
करताना मविप्र संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे. समवेत प्रमुख अतिथी
डॉ. गणेश चंदनशिवे, मविप्र उपाध्यक्ष श्री. विश्वासराव मोरे, मविप्र संचालक
अॅड. संदीप गोपाळराव गुळवे, मविप्र संचालक डॉ. प्रसाद सोनवणे, मविप्र
संचालक श्री. विजय पगार, मविप्र संचालक श्री. रमेश पिंगळे आदी.