के. व्हि. एन. नाईक सिन्नर महाविद्यालयातील खेळाडूचे आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत यश

सिन्नर(प्रतिनिधी) के. व्ही. .एन.नाईक सिन्नर महाविद्यालयाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व नाशिक जिल्हा विभागीय क्रीडा समिती आयोजित आंतर महाविद्यालयीन " कुस्ती स्पर्धा (फ्रीस्टाईल व ग्रिकोरोमन) २०२४" या स्पर्धेत उल्लेखनीय यश
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व नाशिक जिल्हा विभागीय क्रीडा समिती आयोजित आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेचे (फ्रीस्टाईल व ग्रिकोरोमन) २०२४ आयोजन महंत जमनादास महाराज कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे कऱण्यात आले होते.
या आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेमधील फ्रिस्टाइल या प्रकारात महाविद्यालयातील कु. निलेश चांगदेव जाधव (79kg) व वैभव राजेंद्र पोमणार (74kg) तसेच ग्रिकोरोमन या प्रकारात कु. प्रणव दिपक लोंढे (82kg) यांनी उल्लेखनीय यश मिळवले. या तीनही स्पर्धकांची निवड विभागीय स्पर्धेसाठी झालेली असून हे तीनही स्पर्धक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतर विभागीय कुस्ती स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. महाविद्यालयातील या गुणवान खेळाडूंनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल
संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. कोंडाजी (मामा) आव्हाड, उपाध्यक्ष मा. श्री. उदय भाऊ घुगे, सरचिटणीस मा. श्री. हेमंत (आप्पा) धात्रक व सहचिटणीस मा. श्री. दिगंबर (नाना) गीते संस्थेचे विश्वस्त मा.श्री. नामदेव काकड,
संस्थेचे संचालक मा. श्री. हेमंतशेठ नाईक,मा. श्री. समाधान गायकवाड,मा. श्री. जयंत आव्हाड, संचालिका नंदाताई भाबड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले व महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. बाळासाहेब चकोर यांनी अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी प्राचार्य डॉ. किशोर पखाले, समन्वयक डॉ.बाळासाहेब चकोर,
विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. ज्योती गायकवाड, सांस्कृतिक समन्वयक स.प्रा. पूनम कुटे, परीक्षा विभाग प्रमुख स. प्रा. संतोष आव्हाड, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख स. प्रा. मंगल सांगळे, क्रीडा विभाग प्रमुख स.प्रा. अमोल आव्हाड, सर्व वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी बहुमोल मार्गदर्शन केले.