प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे सिन्नर कॉलेजमध्ये गुलाबपुष्पांनी स्वागत

प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे सिन्नर कॉलेजमध्ये गुलाबपुष्पांनी स्वागत

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयातील पहिल्या दिवशी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी स्वागत सोहळा पार पडला. महाविद्यालयातील प्राचार्य व प्राध्यापक यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या मनातील आत्मविश्वास यावेळी ओसंडून वाहत होता. सदर स्वागत सोहळ्यास महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. पूनम कुटे, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी व वाङ्मय मंडळ प्रमुख प्रा. डॉ. मंगल सांगळे, विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्रा. डॉ. ज्योती गायकवाड, परीक्षा विभाग प्रमुख प्रा. संतोष आव्हाड, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. अमोल आव्हाड, प्रा. सुजाता दिघे इतर प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.