आदिवासी समाजाच्या मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन

नाशिक – आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी भारतीय आदिवासी पँथर संघटना व आदिवासी युवक अधिकारी व रोजगार कर्मचारी संघटना वर्ग 3 आणि वर्ग 4 यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे " बेमुदत धरणे आंदोलन " आयोजित करण्यात आले आहे.
या आंदोलनामागील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे:
-
आदिवासी विकास विभागांतर्गत 1791 पदे बाह्य स्त्रोतांऐवजी स्थानिक आदिवासींच्या भरावीत.
-
आदिवासी वस्तीतील युवकांना वर्ग 3 व वर्ग 4 मध्ये रोजगार दिला जावा.
-
अभ्यासक्रम, शैक्षणिक, भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
-
स्थानिक प्रश्नांवर पारदर्शक अमलबजावणी करावी.
या मागण्यांसाठी आधीच 28 मे 2025 रोजी शासन स्तरावर निवेदन देण्यात आले असून 24 जून 2025 रोजी रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आले होते. मात्र अद्याप शासन पातळीवर सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही, म्हणून हे बेमुदत धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
प्राध्यापक तुळशीराम कोठुरे, माननीय अरुण काळे जिल्हाध्यक्ष बहुजन समाज पार्टी, नासिक, माननीय भरतजी सुर्वे, माननीय दीपक औटे, माननीय शुद्धोधन केदारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
शासन स्तरावर योग्य ती कारवाई न झाल्यास, लवकरच व्यापक स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.