आषाढी वारीसाठी महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा गौरवपूर्ण सत्कार

मालेगाव (प्रतिनिधी) – पुणे विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या व्यसनमुक्ती आषाढी वारीत यंदाही महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय, मालेगाव येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. या निमित्ताने महाविद्यालयाच्या वतीने वारीत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साही वातावरणात पार पडला.
या विद्यार्थ्यांनी पंढरपूर वारी दरम्यान विविध प्रकारे सेवा केली. यात वारकऱ्यांना मदत, आरोग्यविषयक मार्गदर्शन, स्वच्छता मोहिमा तसेच रथ यात्रेच्या नियोजनात सक्रिय सहभाग यांचा समावेश होता. पुणे विद्यापीठ परीक्षेत्रातील या उपक्रमात सहभाग घेणे ही महाविद्यालयासाठी गौरवाची बाब असल्याचे प्राचार्यांनी सांगितले.
सत्कार प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. सुभाष निकम उप प्राचार्य.डॉ.अनिल सावळे शैक्षणिक पर्यवेशक डॉ.मनीष सोनवणे कार्यक्रम अधिकारी प्रा. अशोक वाघचौरे, प्रा . चेतन शेवाळे प्रा. उज्वला अहिरे प्रा. लीना पगारे प्राध्यापकवृंद आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राचार्य डॉ.सुभाष निकम यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत म्हटले की, “वारकऱ्यांची सेवा ही खरी अध्यात्मिक साधना असून, विद्यार्थ्यांनी समाजकार्याच्या माध्यमातून आपले सामाजिक भान जपले आहे.”
कार्यक्रमाचे संयोजन प्रा. अशोक वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने महाविद्यालयात समाजकार्य, सेवा भाव आणि अध्यात्मिक संस्कारांचा एक सुंदर संगम पाहायला मिळाला.