बिटको महाविद्यालयात ' केंद्रीय अर्थसंकल्प ' या विषयावर चर्चासत्र संपन्न....

नाशिकरोड :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिक रोड येथील बिटको महाविद्यालयात एम. ए. अर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाच्याप्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ' केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ ' विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ . कृष्णा शहाणे उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ . अनिल सावळे यांनी केंद्रीय अर्थसंकल्प या विषयी बी. ए.व एम .ए.च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना त्यांनी भारतची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन होण्याकरिता भारताला ज्या प्रामुख मार्गाने विकास साध्य करायचा आहे. त्यामध्ये कृषी, सूक्ष्म, लघु, मध्यम ,उद्योग, परकीय गुंतवणूक, व पर्यटन यासारख्या प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे आरोग्य शिक्षण, वैद्यकीय क्षेत्र, यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याचे त्यांनी स्पष्ट केले नविन कर प्रणाली व जुनी कर प्रणाली मधील फरक त्यांनी स्पष्ट केले . विविध घटकांवर करण्यात आलेली सरकारची तरतूद सरकार द्वारे केला जाणारा खर्च व त्या माध्यमातून साधण्यात येणाऱ्या विकासावर डॉ.अनिल सावळे सरांनी भाष्य केले . विद्यार्थ्यांना अर्थसंकल्प अत्यंत साध्या व सोप्या भाषेत त्यांनी समजून सांगितला.
तसेच यावेळी अर्थशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ कृष्णा शहाणे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना यंदाचे केंद्रीय बजेट हे सर्व समावेशक असून यामुळे विविध क्षेत्राच्या विकासाला चालना मिळेल. यातून रोजगार वृद्धी होण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होईल आणि रोजगार वृद्धी म्हणजेच राष्ट्रीय विकासाचे गमक आहे असे सांगितले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ . भास्कर आव्हाड यांनी केले कार्यक्रमाला डॉ .सुनिता अहिरे, प्रा . रत्नपारखी व विभागातील प्राध्यापक यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .