कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव येथे महिला दिन उत्साहात साजरा !

रावळगाव :- श्री स्वामी समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव येथील महिला तक्रार निवारण समिती व जयहिंद लोकचळवळ नाशिक जिल्हा समितीच्या वतीने आज दि ०८ मार्च २०२५ रोजी महिला दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन श्री स्वामी समर्थ विद्याप्रसारक मंडळ डांगसौंदाने ता. बागलाण जि.नाशिक या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री सुरेश दादाजी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे परीक्षा विभाग प्रमुख प्रा. शरद आंबेकर हे तर प्रमुख मार्गदर्शक वक्त्या म्हणून महाविद्यालयातील विज्ञान विद्याशाखा तथा वनस्पतीशास्त्र प्रमुख प्रा. अदिती काळे या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महाविद्यालयातील महिला तक्रार निवारण समितीच्या प्रमुख प्रा. चेतना हिरे यांनी तर प्रस्ताविक प्रा. गीतांजली खैरनार यांनी केले त्यात त्यांनी महिला दिनाच्या आयोजनाचे महत्व सांगितले. तर या प्रमुख पाहुण्यांचा परिचय वैभवी बच्छाव या विद्यार्थिनीने करून दिला, तर आभार प्रदर्शन प्रा. सारिका सोनवणे यांनी केले. या प्रसंगी स्त्रियांना त्यांच्या सर्वांगीण उद्धारासाठी सतत प्रेरणा देणाऱ्या माँसाहेब जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे प्रतिमा पूजन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील उपस्थित महिला कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या प्रा. अदिती काळे म्हणाल्या की, आज महिला या कला, क्रीडा साहित्य, राजकारण, अर्थकारण आशा विविध क्षेत्रात महिला या आज अग्रेसर असल्याचे दिसून येते, असे असले तरीही प्रयेक ठिकाणी महिलांचा सन्मान होतोच असे नाही, प्रत्येक भारतीय स्त्री ही देवीचा अवतार असून ती नारी शक्ती आहे, वेगवेगळ्या पद्धतीने तिची विटंबना करण्यापेक्षा वकेवळ महिला दिनी महिलांचा सन्मान करण्यापेक्षा प्रत्येक दिन महिला दिन समजून महिलांचा सन्मान करा, असे प्रतिपादन केले.
यावेळी महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या प्रा. वर्षा पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यात त्यांनी इतिहास कालीन महिलांच्या कार्याची सविस्तर ओळख करून दिली.
महाविद्यालयातील प्रा. कामेश गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यात त्यांनी देशाच्या विकासात महिलांनी दिलेल्या योगदानाची माहिती दिली.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे परीक्षा विभाग प्रमुख प्रा. शरद आंबेकर म्हणाले की, जगात भारतीय स्त्री ही सर्वात संघर्षशील असून, ती आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर संघर्ष करत असते. संघर्ष करणारी भारतीय स्त्री जगातील प्रत्येक क्षेत्रात आज पोहचली असून, ती नेहमीच आपल्या कार्याचा ठसा उमटवत असते.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा. वर्षा पवार, प्रा. मोहिनी निकम, प्रा. कावेरी जाधव, प्रा.प्रियंका भामरे, प्रा., कार्यक्रमास महाविद्यालयातील सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी प्रा. अंबादास पाचंगे, विद्यार्थी कल्याण मंडळ अधिकारी प्रा. मनीष ठोके, प्रा. राज ठाकरे, प्रा. प्रशांत निकम, प्रा. आकेश दुकळे, यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.