बांबू हस्तकला तीन दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळा डांगसौंदाणे महाविद्यालयात संपन्न

बांबू हस्तकला तीन दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळा डांगसौंदाणे महाविद्यालयात संपन्न

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे तसेच कौशल्य विकास केंद्र बांबू प्रक्रिया प्रकल्प विभाग व श्री सप्तशृंगी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय डांगसौंदाणे ता. बागलाण जिल्हा. नाशिक अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या  संयुक्त विद्यमाने ‘बांबू हस्तकला’ तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा दिनांक 27 फेब्रुवारी ते १ मार्च रोजी संपन्न झाली दि. 27 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी दहा वाजता ‘बांबू हस्तकला’ प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न झाले. उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य जाधव पांडुरंग महादू होते तसेच मा. श्री महेंद्र डबीर समन्वयक कौशल्य विकास केंद्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उद्घाटन म्हणून तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. संजय पंडितराव सोनवणे हे होते. उद्घाटन झाल्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. जाधव सर यांनी बांबू प्रक्रिया प्रकल्प बद्दल सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली तसेच बांबू फर्निचर बांबू प्लेसमेट आणि कोस्टर, बांबूचे कपडे आणि इतर बांबू फॅब्रिकच्या वस्तू, बांबूची खेळणी, बांबूच्या वाट्या आणि क्राफ्ट बॉक्स, बांबू विंड चाइम्स, बांबू बर्डफीडर आणि घरटी पेटी, बांबूचे दिवे आणि कंदील, बांबू क्राफ्ट शिडी (टॉवेल आणि रजाई टांगण्यासाठी), बांबूची घड्याळे,बांबू लागवड करणारे किंवा वनस्पती कंटेनर,बांबूची वाद्ये, बांबूची सजावट,बांबूच्या शिट्ट्या, बांबू मेणबत्तीधारक, बांबूची खोली आणि खिडकीचे पडदे (आणि खिडकीचे शटर), बांबू बाग कारंजे आणि पाण्याची वैशिष्ट्ये, बांबूच्या टोपल्या, बांबूच्या चटया,बांबू लघु फर्निचर आणि मॉडेल,घरासाठी बांबूचे सांधे,बांबू प्रात्यक्षिक मोटर,भिंतींसाठी बांबू बोर्ड, बांबूच्या सायकली इ. वस्तु बनिवल्या जातात असे संगितले.

मा. महिंद्र डबीर समन्वयक यांनी बांबू प्रक्रिया व हस्तकला ही लयास चाललेली कला आहे, ती कशी प्रत्येक  माणसांमध्ये रुजवता येईल याचे महत्त्व सांगितले व बांबू हे गवतवर्गीय वनस्पती आहे. बांबू हे भारतात उगवणारे एक बहुपयोगी आयुर्वेदिक औषधी आहे. बांबू हे पुनर्वसु नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. बांबू हे जगातील काही जलद वाढणाऱ्या वनस्पतींचा समावेश होतो. बांबूच्या काही प्रजाती २४ तासांच्या कालावधीत ९१ सेंटीमीटर (३६ इंच) वाढू शकतात. बांबू हे उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय ते सौम्य समशीतोष्ण प्रदेशात उगवतात. बांबू हे एक प्रकारचे गवतच आहे. बांबू हे Poaceae कुटुंबातील उंच झाडासारख्या गवताचे उपकुटुंब आहे. बांबूची लागवड केल्यावर वेळोवेळी फांद्यांची तसे वेड्या वाकड्या काठ्यांची छाटणी करणे आवश्यक असते. बांबूपासून अनन्यसाधारण कला साकारली जाते. अशी माहिती सांगितली.

मा. संस्थापक अध्यक्ष यांनी संगितले की बांबूला कीटकनाशके किंवा रासायनिक खतांची आवश्यकता नाही. ते वेगाने वाढते आणि मी ३-५ वर्षांत कापणीसाठी तयार आहे. त्याला क्वचितच पुनर्लागवडीची आवश्यकता असते. ते कार्बन डायऑक्साइड शोषून घेते आणि कार्बन न्यूट्रल असते. ते झाडांपेक्षा जास्त ऑक्सिजन तयार करते. वातावरणातील ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडच्या संतुलनात ते महत्त्वाची भूमिका बजावते. त्याला सिंचनाची आवश्यकता नाही मातीची धूप रोखण्यासाठी हे उत्कृष्ट आहे. ते विविध वातावरणात वाढते. तंतूंमध्ये त्याचे उत्पादन इतर तंतूंच्या तुलनेत, विशेषतः कृत्रिम तंतूंच्या तुलनेत कमी पर्यावरणीय परिणाम करते,अशी माहिती सांगितली  बांबू आणि त्यापासून बनलेले वस्तू यांचे महत्त्व पटवून दिले व उद्घाटन झाल्यानंतर प्रशिक्षणाला सुरुवात झाली बांबू कला प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले तसेच सूत्रसंचालन कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. आर.डी नाडेकर यांनी केले तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता कार्यशाळाला सुरुवात झाली व बांबूच्या विविध वस्तू कशा बनवाव्यात याचा प्रशिक्षण व स्वतः विद्यार्थ्यांनी वस्तू बनवण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्या दिवशी १. मार्च 2025 रोजी कार्यक्रमात व कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तू याचा प्रदर्शन मानण्यात आले व शेवटी माननीय प्राचार्य जाधव यांनी आभार प्रदर्शनात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून आलेले समन्वयक,प्रशिक्षक,अतिथि याचे कौतुक केले तसेच कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. आर.डी नाडेकर यांनी घरे,शाळा,इमारत,अक्सरीज,नन्न,इंधन,बांबू फर्निचर,गालिचे व कापड,कागद,खेळणी इत्यादि वस्तु विना प्रदूषण वस्तु बनतात ह्यामुळे प्लॅस्टिकच्या ठिकाणी बांबूच्या वस्तु वापरता येतील असे प्रतिपादन केले.व विद्यार्थ्यांना समन्वयक,प्रशिक्षक,अतिथि यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. सूत्रसंचालन प्रा.लोटण जाधव यांनी केले। कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.