माझी वसुंधरा सप्ताह निमित्त नाशिक शहर स्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद!

माझी वसुंधरा सप्ताह निमित्त नाशिक शहर स्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद!

नाशिक महानगरपालिका पर्यावरण व शिक्षण विभाग आणि सिमेन्स कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा सप्ताह अंतर्गत २९ एप्रिल २०२५ रोजी नाशिक शहर स्तरीय विज्ञान प्रदर्शन यशस्वीरित्या पार पडले. या प्रदर्शनाचे आयोजन मा. उपआयुक्त तथा शिक्षणाधिकारी श्री. नितीन पवार यांच्या मार्गदर्शना व क्लीन इट ऑल यांच्या प्रयोजणार्थ करण्यात आले होते. 

माझी वसुंधरा सप्ताह हा उपक्रम नाशिक शहरातील इयत्ता ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक २७ एप्रिल ते २९ एप्रिल २०२५ दरम्यान करण्यात आला . यामधून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची गोडी व पर्यावरण बाबतची प्रयोगशीलता तांत्रिक कौशल्ये विकसित करण्यावर भर दिला होता.

या विज्ञान प्रदर्शनात २२ प्रकल्पांसह सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अभिनव प्रकल्पांपैकी ४  प्रकल्पांना विजेतेपद मिळाले.

विजयी विद्यार्थ्यांची यादी:

कार्तिकी बारवकर म न पा शाळा क्र ३ नांदूर   सहावी मोफत वीज निर्मिती प्रकल्प 

सोहम नरेश औटे आदर्श विद्यामंदिर नाशिक रोड सहावी AI BASED SMART WASTE DUSTBIN

सृष्ठी खरात म न पा शाळा क्र १८  आनंदवल्ली आठवी reduce-Reuse-Recycle

हीना अहमद म न पा हायस्कूल वडाला नववी नदी शुद्धीकारण

कार्यक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपायुक्त श्री सातळकर, उपायुक्त (पर्यावरण तथा शिक्षण) श्री नितीन पवार, उप विभागीय अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ श्री प्रशांत गायकवाड, क्लीन आयटी ऑल चे संस्थापक नितेश नारायनन आणि प्रिया डिगरसे उपस्थित होते. 

यावेळी २२ पर्यावरण पूरक प्रयोगाचे कौतुक करत, असेच प्रयोग करून त्याचे व्यावसायिकरण करून उद्योजक व्हावे व ही उपक्रम विद्यार्थ्यांच्या भविष्याला नवी दिशा देत असून, विज्ञान आणि नवोपक्रम क्षेत्रात त्यांची रुची वाढवण्यास मदत करत आहे. असे कार्यक्रम वेळोवेळी राबवावेत असे महानगरपालिका अधिकारी यांना सूचित करून अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांनी विद्यार्थ्याना प्रोत्साहन व बक्षीस देऊन देऊन कार्यक्रमाचा समारोप केला.