"मतभेद विसरून पक्षबांधणीसाठी एकजुटीने काम करा" – खा. तटकरे यांचे आवाहन
नाशिक – राष्ट्रवादी भवन, नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक जिल्हा कार्यकारिणी व प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. खा. तटकरे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सर्वांनी एकजुटीने व मतभेद विसरून पक्षबांधणीसाठी झोकून देऊन काम करण्याचे आवाहन केले. तसेच, पक्षाचे कार्य शहरातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आणि लवकरच होणाऱ्या निवडणुकांसाठी तयारीला लागण्याचे निर्देश दिले.
या बैठकीला राज्य प्रवक्ते आनंद परांजपे, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, आमदार दिलीपराव बनकर, आमदार हिरामण खोसकर, आमदार सरोज अहिरे, आमदार नितीन पवार, युवक अध्यक्ष सुरज चव्हाण, युवती अध्यक्ष संध्या सोनवणे, विद्यार्थी अध्यक्ष प्रशांत कदम, सामाजिक न्याय अध्यक्ष सुनील मगरे, देविदास पिंगळे, दिलीप खैरे, नाना महाले, जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पगार, विष्णुपंत म्हैसधुणे, गोरख बोडके, प्रेरणा बलकवडे, ॲड. संदीप गुळवे, कविताताई कर्डक, बाळासाहेब कर्डक, लतिफ तांबोळी, युवक जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ, डॉ. योगेश गोसावी, राजेंद्र डोखळे, उदय आहेर, संपतराव सकाळे, पूजा आहेर, प्रसाद सोनवणे, नितीन चंद्रमोरे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत जिल्हास्तरीय संघटनात्मक मजबुती, स्थानिक पातळीवरील समन्वय, जनतेशी थेट संपर्क व पक्षाच्या कार्यपद्धतीबाबत सखोल चर्चा झाली. एकात्मतेचा संदेश देत ही बैठक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरली