वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी: प्राचार्य डॉ ज्ञानोबा ढगे

वाणिज्य विभागातून पदवी- पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना उद्योजकतेमध्ये, स्टार्टअप मध्ये मोठा वाव असून विद्यार्थ्यांनी रोजगार शोधण्याच्या ऐवजी स्वतःचा उद्योग उभारावा, व्यवसाय, व्यापारात जावे. अलीकडील काळात ई-कॉमर्स, विक्री, विपणन,वितरण, शेअर मार्केट, विमा बँकिंग, चार्टर्ड अकाउंटन्सी, परदेशी व्यापार, स्टॉक ब्रोकिंग अँड इन्व्हेस्टमेंट अँड अनालिस्ट आदी ठिकाणी महत्त्वाच्या संधी आहेत. शिक्षण घेताना याचा विचार विद्यार्थ्यांनी करून करिअर निवडावे.
वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना परंपरागत नोकरी बरोबरच विविध व्यवसायांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर नोकरीच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यात वाणिज्य शाखेचा नक्कीच लाभ घेता येईल असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे यांनी केले. मविप्र समाज संस्थेच्या निफाड येथील कर्मवीर गणपत दादा मोरे महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या तृतीय वर्ष वाणिज्य आणि एम कॉम वर्गांच्या निरोप समारंभाप्रसंगी (सोमवार,दिनांक 28 एप्रिल) ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. नरेश सोनटक्के, डॉ प्रवीण ढेपले, डॉ सुझान लॉरेन्सिया, प्रा अभय वडघुले, प्रा योगेश कडलग,प्रा आर शिंदे, प्रा प्रवीण शार्दुल आदी उपस्थित होते.
डॉ. ज्ञानोबा ढगे पुढे म्हणाले की, वाणिज्य विद्या शाखा ही उद्योजकता,व्यवसाय,सेवा,सहकार अधिक क्षेत्रासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करत असते. विद्यार्थ्यांनी भविष्यात या दिशेने प्रयत्न करून एक यशस्वी उद्योजक, उत्तम व्यावसायिक आणि महाराष्ट्राच्या प्रगतीची ओळख असणारी सहकार चळवळ पुढे नेण्याचे काम करावे असे मत व्यक्त केले.
यावेळी मनोज ढोमसे, राजेश्री शिंदे, बर्वे, कावेरी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून महाविद्यालयातील आठवणींना उजाळा दिला. डॉ.प्रवीण ढेपले,डॉ. सुजान लॉरेन्सिया यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांचे हस्ते सर्व विद्यार्थ्यांचा पेन आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार केला आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ नरेश सोनटक्के यांनी केले कु. कावेरी गोराणे आणि गायत्री फटांगडे यांनी सूत्रसंचालन केले. श्रीमती ऋचा जगताप यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी श्रीमती ऋतुजा डुंबरे, श्रीमती माधुरी थेटे, प्रा. निकेतन महाले तसेच डॉ. देविदास शिंदे, डॉ. प्रविण शार्दुल, प्रा. योगेश कडलग, डॉ. महेश बनकर व सर्व प्राध्यापक वृंद आणि प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.