भारताला विश्वगुरु बनवण्यासाठी तरुणांचे योगदान महत्त्वाचे - डॉ. पी. वाय. व्याळीज

भारताला विश्वगुरु बनवण्यासाठी तरुणांचे योगदान महत्त्वाचे - डॉ. पी. वाय. व्याळीज

 रावळगाव :- श्री स्वामी समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव ता. मालेगांव जि. नाशिक येथे ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन श्री स्वामी समर्थ विद्या प्रसारक मंडळ डांगसौंदाणे ता.बागलाण जि.नाशिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. सुरेश दादाजी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जय हिंद लोक चळवळ नाशिक जिल्हा समितीचे जिल्हा समन्वयक विजय अहिरे यांच्यासह गावातील प्रतिष्ठीत नागरिक रामदास पवार, दिलीप पवार, जयपाल गरुड, दीपक गायकवाड हे होते, तर या  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. वाय. व्याळीज हे उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. वाय. व्याळीज यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या भारतमातेच्या प्रतिमेचे प्रतिमा पूजन करून, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. वाय. व्याळीज यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. निलेश देवरे यांनी तर प्रस्ताविक प्रा. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. जितेंद्र मिसर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. कामेश गायकवाड यांनी केले.

         यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. वाय. व्याळीज म्हणाले की, जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून जगात ओळखला जाणाऱ्या भारताच्या संविधानाची अमलबजावणी आजच्याच दिवशी सुरु झाली असून, भारतीय संविधानामुळे आज सर्वांना मुक्तपणे संचार करता येतो आणि सर्वांना सर्वांचा सर्वांगीण विकास साधता येतो. सद्यस्थितीतील भारताचा प्रवास हा विश्वगुरु होण्याच्या दिशेने सुरु असून, यासाठी तरुणांनी व सर्वानीच लोकशाही मुल्यांची जपणूक करणे गरजेचे असून भारताला खऱ्या अर्थाने विश्वगुरु बनवण्यासाठी तरुणांचे योगादन महत्त्वाचे राहणार आहे, असे प्राचार्य डॉ. पी. वाय. व्याळीज यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले.

            यावेळी राज्यशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व जय हिंद लोक चळवळ नाशिक जिल्हा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त तरुण मतदारांमध्ये मतदान जनजागृती व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय मतदार दिन सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते, या परीक्षेतील गुणवंतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. वाय. व्याळीज यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.

      या कार्यक्रम प्रसंगी प्रा. शरद आंबेडकर, प्रा. अंबादास पाचंगे, प्रा. भरत आहेर, प्रा. मनिष ठोके, प्रा. आकाश दुकळे, प्रा. राज ठाकरे, प्रा. प्रशांत निकम, प्रा. वर्षा पवार, प्रा.सौ.जी.एस.खैरनार, प्रा. अदिती काळे, प्रा. मोहिनी निकम, प्रा. प्रांजल पवार, प्रा. नेहा गांगुर्डे, प्रा. सोनम पाटील, प्रा. प्रियंका भामरे, प्रा. सारिका सोनवणे, प्रा. पायल गायकवाड, यांच्यासह कार्यालयीन अधिक्षक दिपक पवार, महेंद्र पगारे, शालीवान ठोके, राकेश शिरसाठ, मंगेश नंदाळे, मनोहर राजनोर, अमोल शिंदे, किरण बच्छाव, कमलेश अहिरे, महेश बच्छाव, सचिन भदाणे, राहुल अहिरे, चेतन पवार, यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.