क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सिन्नर येथे संविधान दिन साजरा

क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सिन्नर येथे संविधान दिन साजरा

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीयांना संविधानाच्या रूपाने मोठी भेट दिली.संविधान हा भारतीयांचा कायदेशीर दस्तावेज असून तो देशवासियांचा अमूल्य ठेवा आहे, असे प्रतिपादन  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बहि:शाल शिक्षण मंडळाचे व्याख्याते डॉ.श्यामसुंदर झळके यांनी केले. "भारतीय संविधान " या विषयावर त्यांनी प्रमुख वक्ते म्हणून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून  तसेच भारतीय संविधानाचे पूजन करून झाली. क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान स्विकृतिदिन  साजरा करण्यात आला. 

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे विश्वस्त नामदेवराव काकड होते. 

डॉ.झळके यांनी आपल्या भाषणातून राज्यघटनेने दिलेले मूलभूत हक्क  तसेच संविधाना मागची पार्श्र्वभूमी  विषद केली. यावेळी  भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामुदायिक वाचन करण्यात आले.

राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी सहा.प्रा. मंगल सांगळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पखाले ह्यांनी विद्यार्थ्यांना संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला बहाल केलेले अधिकार व कर्तव्ये यांची ओळख करून दिली.

        यावेळी माळेगावचे माजी सरपंच एस.टी. सांगळे, डॉ.आर. आर. बोडके आदी मान्यवर उपस्थित होते. 

तसेच सदर कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील क्रीडा विभाग प्रमुख सहा.प्रा. अमोल आव्हाड, सांस्कृतिक विभाग प्रमुख सहा.प्रा. पूनम कुटे, विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी सहा. प्रा. ज्योती गायकवाड, परीक्षा विभाग प्रमुख सहा. प्रा. संतोष आव्हाड, सहा. प्रा. सागर सानप तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, सर्व कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सहाय्यक प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा.प्रा. शुभांगी बोडके ह्यांनी केले तर सहा.प्रा. माधुरी उन्हाळे ह्यांनी आभार मानले.