डांगसौंदाणे महाविद्यालयाच्या प्रा. राजाराम नाडेकर यांना ओल्ड ह्युमँनिटी कमिशन (U.S.A) व दिल्लीचा ‘नॅशनल इन्वार्यमेंट रिफॉर्म अण्ड प्रोटेक्शन’ संस्थेचा पुरस्कार

डांगसौंदाणे महाविद्यालयाच्या  प्रा. राजाराम नाडेकर यांना ओल्ड ह्युमँनिटी कमिशन (U.S.A) व दिल्लीचा ‘नॅशनल इन्वार्यमेंट रिफॉर्म अण्ड प्रोटेक्शन’ संस्थेचा पुरस्कार

डांगसौंदाणे: येथील तुळजाभवानी एज्युकेशन  सोशल अँड वेल्फेअर सोसायटी संचलित श्री सप्तशृंगी कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय डांगसौंदाणे येथील प्रा. राजाराम नाडेकर  यांना धुळे येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ‘डिजास्टर मॅनेजमेंट’ या जागतिक परिषदेत अमरसिंह यादव, राष्ट्रीय अध्यक्ष आणि विजय नवल पाटील (संस्थेचे विश्वस्त) यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावर पर्यावरण रक्षणासाठी लोकचळवळ उभी करणाऱ्या ‘नॅशनल इन्वार्यमेंट रिफॉर्म अण्ड प्रोटेक्शन’ संस्थेने ‘नॅशनल इन्वार्यमेंट वॉरियर’ (पर्यावरण  योद्धा )पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

त्यांनी या जागतिक परिषेदत पर्यावरण विषयक शोध निंबंध ही सादर केले. व पर्यावरण विषयक विविध विषयांवर सखोल संशोधन केले आहे. तसेच अनेक राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोध निबंध सादर केले आहेत व उच्च मानक असलेल्या जागतिक किर्तीच्या विविध जर्नल्समध्ये शोध निबंध प्रकाशित केले आहेत. तर  विविध ठिकाणी पर्यावरणविषयी जनप्रबोधनात्मक व्याख्याने दिली आहेत. विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासूनच पर्यावरण विषयी आत्मीयता व आत्मभान निर्माण व्हावे यासाठी सतत लेखन करीत असतात. तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी आहेत तसेच स्वयंसेवकांना पर्यावरण विषयक जनजागृती करत आहेत पुरस्कार मिळाल्याबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मा.संजय पंडितराव सोनवणे सरचिटणीस सुशील कुमार सोनवणे ,मा. सचिन उत्तमराव पाटील (विश्वस्त) प्राचार्य पांडुरंग जाधव प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी   यांच्यासह महाविद्यालय परिवारातील सर्वांनी पुरस्कार प्राप्त प्राध्यापकांचे अभिनंदन केले.