सातपूर महाविद्यालयात रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान संपन्न......

सातपूर येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत रस्ता सुरक्षा अभियान प्रभाविपणे राबविण्यात आले. या अनुषंगाने महाविद्यालयाचे प्राचार्य एस.एस तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली.राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकासाठी रस्ता सुरक्षा अभियान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी वाहतूक शाखा नियंत्रक युनिट क्रमांक 3 चे वाहतूक हेड कॉन्स्टेबल श्री सचिन जाधव यांच्या व्याख्यांनाचे आयोजन करण्यात आले.आपल्या मनोगतात वाहतुकीचे अनेक नियम हेल्मेट न वापरणे स्टॉप लाईन चे महत्व गाडी चालवत असताना मोबाईल न वापरणे त्यामुळे भरावा लागतो तो दंड पोलीस यंत्रणा जे अनेक इलेक्ट्रिक उपकरणे वापरत असतात व त्याचे कार्य कश्याप्रकारे चालते यांची सविस्तर माहिती श्री.सचिन जाधव यांनी दिली हेल्मेट न वापरनें सीट बेल्ट न लावणे गाडी वाहन चालवत असताना गतीने चालवने यामुळे अनेक अपघात होत असतात अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण हे सर्वात जास्त आहे नियमात नियंत्रित वेगात आपले वाहन चालवले पाहिजे जेणेकरून आपल्या जीविताला हानी पोहचणार नाही अशा प्रकारे आपण आपले वाहन चालवा असे आवाहन राष्ट्रीय स्वयं सेवकांना केले आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. एस. एस.तावडे यांनी सांगितले की लोकसंख्या वाढल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक चालते दुचाकी चालवताना सर्वांनी हेल्मेटचा वापर करावा आणि गती व सुरक्षा विषयी असणारे सर्व नियमांचे पालन करूनच आपण आपले वाहन चालवले पाहिजे असे त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एस. एस.गांगुर्डे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्तविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी. एम. डी. शेंडगे यांनी केले कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रा. व्ही. पी. मोगल प्रदर्शन यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते