के. व्ही. एन. नाईक सिन्नर महाविद्यालयात तृतीय वर्ष वर्गातील विद्यार्थ्यांना निरोप

के. व्ही. एन. नाईक सिन्नर महाविद्यालयात तृतीय वर्ष वर्गातील विद्यार्थ्यांना निरोप

सिन्नर: (प्रतिनिधी) क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथे आज दिनांक ५ एप्रिल २०२५ रोजी तृतीय वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला 

याप्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी संस्थेचे विश्वस्त नामदेवराव काकड, संस्थेचे संचालक समाधान गायकवाड तसेच संस्थेचे संचालक जयंत आव्हाड व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किशोर पखाले उपस्थित होते.

या निरोप समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान संस्थेचे संचालक नामदेव काकड यांनी भूषवले. यावेळी या कार्यक्रमाचे औचित्य साधून बेस्ट सिटी चॅप्टरचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सिन्नर क्रेडाईचे अध्यक्ष व संस्थेचे संचालक समाधान गायकवाड यांचा महाविद्यालयातर्फे सन्मान देखील करण्यात आला.

महाविद्यालयाला निरोप देताना विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाबद्दल व प्राध्यापकांबद्दल आपले भावनिक मनोगत व्यक्त केले, तसेच प्राध्यापकांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत जड अंतःकरणाने त्यांना निरोप दिला. 

यावेळी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना संस्थेचे संचालक समाधान गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी व्हा मात्र आपले पाय कायम जमिनीवरच असू द्या असा सल्ला दिला, तर संस्थेचे संचालक जयंतराव आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शुभेच्छा देताना त्यांनी भविष्यात केवळ नोकरीला प्राधान्य न देता स्वतःचा छोटासा व्यवसाय देखील सुरू करावा व त्यात यशस्वी व्हावे असे प्रतिपादन केले. आपल्या प्रास्ताविकामधून प्राचार्य डॉ. किशोर पखाले यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व भविष्यात विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कायम ऋणी राहून महाविद्यालयाचे नाव उज्वल करावे असे मत व्यक्त केले. तर आपल्या अध्यक्षीय भाषणातून संस्थेचे संचालक नामदेव काकड साहेब यांनी विद्यार्थ्यांना यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी काही झाडांची रोपे आपल्या आठवणीची भेट म्हणून महाविद्यालयाला दिली. व विद्यार्थ्यांना अल्पोहार देऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. ज्योती गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. पूनम कुटे यांनी केले. कार्यक्रमास परीक्षा विभाग प्रमुख प्रा. संतोष आव्हाड, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी सहा. प्रा. डॉ. मंगल सांगळे, क्रीडा विभाग प्रमुख सहा. प्रा. अमोल आव्हाड, IQAC समन्वयक प्रा. ज्ञानेश्वर चकोर इतर प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.