राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी - स्कूल कनेक्ट २.०

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी - स्कूल कनेक्ट २.०

श्री सप्तशृंगी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ,डांगसौंदाणे येथे दि. ०७/०१/२०२५ रोजी महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी उच्च शिक्षण व्यवस्थेचे संपूर्ण नूतनीकरण आणि अमुलाग्र व्यापक बदल लक्षात घेऊन छत्रपती आश्रम शाळा व कनिष्ट महाविद्यालय डांगसौंदाणे, येथे शाळांमधील ९ वी, १० वीचे विद्यार्थी आणि कनिष्ठ महाविद्यालयातील १२ वीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत सकारात्मक बाबी पोहोचविण्यासाठी "स्कूल कनेक्ट २.०" परिणामकारक पद्धतीने राबविण्याबाबत आले .शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या नवीन बदलांच्या अनुषंगाने आंतरवासिता, भारतीय ज्ञानव्यवस्था, स्वयम, PM Vidyalaxmi कर्ज योजना, साथी, विविध अभ्यासक्रम, आंतरविद्याशाखीयता याबाबतची माहिती प्राचार्य जाधव पांडुरंग यांनी विद्यार्थ्यांना दिली , आणि १२ वी नंतर योग्य तो अभ्यासक्रम निवडण्यासाठी विद्यार्थ्यांना व पालकांना जागृत करून त्यांचे समुपदेशन याद्वारे उच्च शिक्षणात प्रवेशित विद्यार्थी संख्येत वाढ होऊन भविष्यात आपल्या महाविद्यालयात / संस्थेत विद्यार्थी प्रवेशाचा ओघ वाढण्यात याचा फायदा होईल.असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्रा.आर.डी नाडेकर यांनी केले. छत्रपती आश्रम शाळा व कनिष्ट महाविद्यालय डांगसौंदाणे येथील प्राचार्य पाटील.पी.पी. हजार होते तसेस प्राध्यापक, कर्मचारी, विध्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.