9 News महाराष्ट्र
श्री किशोर बेलसरे , संचालक , आणि संपादक , 9 News महाराष्ट्र.
असं म्हणातत की 'प्रत्येक माणसाचं आयुष्य हे शून्यातूनच निर्माण होत असत आणि नंतर ती व्यक्ती यशाचे एक एक शिखर पार करत असते'. अगदी याच सिद्धांताप्रमाणे तीन मित्र किशोर बेलसरे, चिराग शर्मा, अशोक कुटे यांचा यशोशिखर गाठणारा प्रवास म्हणजे 9 News महाराष्ट्र.
महावद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर या तीघेहि नेहमी वृत्तपत्रातून येणाऱ्या दैनंदिन बातम्यांचे अवलोकन करायचे आणि तेव्हापासूनच ह्या क्षेत्राचे आकर्षण वाटू लागले. या क्षेत्राकडेच वळण्याचे तीघांनी ठरविले. दरम्यान प्रथम दैनिक वृत्तपत्रा मधे काम करण्याची संधी मिळाली. पुढे जाऊन यामाध्यमातून मोठा अनुभव देखील मिळाला . हे करत असतानाच त्यावेळी इलेक्ट्रॉनिक मीडीयाचा मोठा प्रचार व प्रसार वाढू लागला होता म्हणून इलेक्ट्रानिक मिडीया विषयीचे आकर्षण त्यांना खुणावू वाटू लागले . अशावेळी स्थानिक वृत्तवाहिनीच्या माध्यमातून काम सुरू केले. सामजिक , राजकीय सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील घडामोडींचे वृत्त संकलन केले. हे जिकीरीचे काम करित असताना पोचपावती म्हणून श्री किशोर बेलसरे यांना अंतराष्ट्रीय वृत्तवाहिनी 'एन डी टीव्ही' ने उत्तर महाराष्ट्र ब्युरो रिपोर्टर केले . याद्वारे मला नगर, जळगांव , नंदूरबार , धुळे या सारख्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली.तर चिराग शर्मा यांना इंडिया टीव्ही ब्यूरो रिपोर्टर ची संधी मिळाली.
या सर्व अनुभवाची शिदोरी गाठीशी असल्यामुळे, या क्षेत्रात काम करण्याची गोडी वाढली. स्वतःचे लोकल चॅनल सुरू करण्याची प्रबळ इच्छा निर्माण झाली . जुन्या मित्रांच्या सहकार्याने आम्ही प्रथम 'नाईन न्युज' चॅनल सुरू केले. या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न, समस्या हे शासन दरबारी मांडण्याची संधी प्राप्त झाली या कामाच्या माध्यमातून समाजसेवा करायला मिळत असल्याचं समाधान लाभलं.
पहिल्या वर्धापन दिनी गोदातीरी भव्य दिव्य सोहळा आयोजित केला. यामध्ये आम्ही २६-११ रोजी मुंबई आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस परिवारांचा नाशिककरांच्या वतीने सन्मान केला तसेच ऑस्कर पुरस्कार विजेता हिंदी चित्रपट 'स्लमडॉग' या चित्रपटातील बाल कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी कौतुक समारंभ आयोजित केला होता. या दिमाखदार सोहळ्यासाठी हजारो नागरिक उपस्थित होते .
नाईन न्यूज च्या माध्यमातून बातमी मागील बातमी, बातमीची सत्यता लोकांसमोर पोहचवली जाते. नाईन न्यूज च्या माध्यमातून प्रसारित झालेल्या अनेक बातम्यांची प्रशासनाला देखील दखल घ्यावी लागली. तसेच नाईन न्यूज च्या माध्यमातून सिंहस्थ कुंभमेळा, महाशिवरात्र गणपती विसर्जन मिरवणूक, शिवजयंती या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण केले जाते. 'महासंग्राम' या कार्यक्रमाअंतर्गत निवडणुकीच्या काळात राजकीय तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींना बोलावून विश्लेषणात्मक चर्चासत्र, आजार आणि उपचार या संदर्भातील 'आरोग्यम् धनसंपदा', बांधकाम क्षेत्राला बुस्ट देण्यासाठी सुरू असलेल्या बांधकाम व्यावसायिकांच्या मुलाखती अशी विशेष सदरं दर्शकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहेत.
या पत्रकारिता क्षेत्रात काम करत असताना अनेक चांगली माणसं भेटत गेली. तेव्हा या लोकांच्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान करावा; आणि ज्यांनी सामाजिक क्षेत्रात बहुमुल्य योगदान दिले अशा व्यक्तींसाठी 'गोदा सन्मान' या पुरस्कार वितरण सोहळ्याची सुरुवात झाली. गोदातीरी संपन्न होत असलेल्या या कार्यक्रमासाठी आता मंत्री, खासदार, आमदार ,आयएएस , आयपीएस अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभते.
2022 वृत्तवाहिनीचा 14 वा वर्धापन दिन आणि 'गोदा सन्मान' पुरस्कार वितरण सोहळ्याचे पाचवे वर्ष होते.
आतापर्यंत या सोहळ्यासाठी माजी पालकमंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री छगनराव भुजबळ ,कृषी मंत्री दादाजी भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार संजय राऊत, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सिनेकलाकार नागेश भोसले, अभिजीत खांडकेकर, अनिता दाते , हार्दिक जोशी, अमृता पवार असे अनेक दिग्गज प्रमुख अतिथी म्हणून लाभलेत.
अशी नवी ऊर्जा घेऊन आता नाईन न्यूज वृत्तवाहिनी फक्त नाशिक जिल्ह्या पुरतीच मर्यादित न राहता राज्य पातळीवर काम करणार आहे. याच दृष्टीने' नाईन न्यूज महाराष्ट्र' या नावाने आता आमची राज्यभर नवी ओळख निर्माण झाली आहे!
अर्थातच कोणतंही काम टीम शिवाय पूर्ण होत नाही. संपूर्ण नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागासह शहरात गणेश महाराष्ट्राचे रिपोर्टर आहेत.
आता बदलत्या काळानुसार 9 News महाराष्ट्र हि वृत्तवाहिनी यूट्यूब चैनल, फेसबुक पेज, इंस्टाग्राम, वेब पोर्टल या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचली आहे.
संचालक आणि मुख्य संपादक : श्री किशोर बेलसरे.
सहसंचालक : श्री अशोक कुटे, श्री चीराग शर्मा.
उपसंपादक आणि अँकर : सौ.सुनिता भगुरे चौहाण
Mail id : ninenewsnashik@gmail.com